प्रतिष्ठा न्यूज

तमाशा सम्राज्ञी श्रीमती हिराबाई कांबळे पाचेगांवकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर; आमदार सुमनताई पाटील यांनी केला सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार (२०११) पारंपारीक तमाशा सम्राज्ञी श्रीमती हिराबाई कांबळे यांना नुकताच जाहीर झाला. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांनी बस्तवडे गांवी जावून श्रीमती हिराबाई कांबळे यांचा सन्मान केला. नामांकीत तमाशा सम्राज्ञीच्या नावाने मिळणारा महाराष्ट्र शासनाचा हा मानाचा जीवन गौरव पुरस्कार आमच्या सांगली जिल्ह्यातील ९३ वर्षीय एका पारंपारीक तमाशा सम्राज्ञीला मिळतो आहे याबद्दल आमदार पाटील यांनी आनंद व्यक्त केला. श्रीमती हिराबाईंचा पारंपारीक तमाशा कलेचा वारसा सध्या मा. जयसिंग आणि लता लंका पाचेगांवकर हे चालवीत आहेत याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले . या सन्मान प्रसंगी तमाशा सम्राज्ञी श्रीमती हिराबाई कांबळे ‘ आमदार सुमनताई पाटील ‘ मा. जयसिंग ‘ लता लंका पाचेगांवकर आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.