प्रतिष्ठा न्यूज

नव कृष्णा व्हॅली स्कूलच्यावतीने एक तारीख एक तास श्रमदान उपक्रम उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली: नव कृष्णा व्हॅली स्कूल यांच्या वतीने “एक तारीख एक तास श्रमदान”  या उपक्रमांतर्गत शालेय परिसरासोबत शाळेजवळील परिसर व एमआयडीसी पोलीस ठाणे कुपवाड  येथे विद्यार्थ्यांच्या वतीने सामूहिक स्वच्छता करणेसाठी ” एक तास श्रमदान” कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता नागरिकांना स्वच्छ भारतचा एक भाग म्हणून स्वच्छतेच्या उपक्रमांतर्गत नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम व संस्थेतील विविध विभागातील विभागातील सर्व स्टाफ यांच्या वतीने शाळेतील सभोवतालचा परिसर  श्रमदान
करून  स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे काढण्यात आली. तसेच कुपवाड एम. आयडीसी  परिसरातील विविध इंडस्ट्रीजला भेट देऊन तेथील कचरा व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊन तसेच कचरा व्यवस्थापन  याविषयी  उद्बोधन करण्यात आले. स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारातील स्वच्छता करण्यात आली.
यावेळी एमआयडीसी पोलीस  ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी उपस्थित शिक्षक विद्यार्थी यांचे  स्वागत करून आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. पोलीस स्टेशन मार्फत इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्य संगीता पागनीस.  मराठी माध्यमचे प्राचार्य अधिकराव पवार यांना रोपे देऊन सत्कार केला.
  स्वच्छ भारत ही एक सामाजिक जबाबदारी आहे आणि प्रत्येकानी यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. त्यास अनुसरून आज नव कृष्णा व्हॅली स्कूलचे सर्व स्टाफ व विद्यार्थी स्वच्छतेच्या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सामील झाले होते.
 आजच्या या उपक्रमात सुरज फौंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्य  संगीता पागनीस उपप्राचार्य  प्रशांत चव्हाण  मराठी माध्यम मुख्याध्यापक अधिकराव पवार. प्रशासन अधिकारी रघुनाथ सातपुते क्रीडा सचिव   विनायक जोशी, गुरुकुल प्रमुख संतोष बैरागी, अश्विनी माने, अकाउंटंट श्रीशैल  मोटगी, राजेंद्र पाचोरे आदि विभागप्रमुख व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ मोठ्या संख्येने स्वच्छता अभियान व श्रमदानामध्ये सहभागी झाले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.