प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता विनानिविदा देणेत येणाऱ्या कामांची सभा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज येथे  जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना विनानिविदा देणेत येणाऱ्या कामांची सभा पार पडली. यावेळी जवळपास १० कोटींची एकूण १३५ कामे बेरोजगार अभियंत्यांना देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जत तालुक्यातील ७३ कामे, सांगली मिरज मधील २८ कामे, पलूस कडेगाव येथील ३० कामे , शिराळा तालुक्यातील २ कामे अशी १० कोटींची १३५ कामे लॉटरी पद्धतीने देणेत आली.
      सार्वजनिक बांधकाम मिरज च्या इतिहासात सर्वात जास्त कामे यावेळी बेरोजगार अभियंत्यांना वाटप करण्यात आली. या काम वाटप सभेला जिल्ह्यातून जवळपास ४०० सुबे उपस्थित होते. सांगली मिरज मध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याची संख्या यावेळी लक्षणीय होती पण कामांची संख्या कमी होती.
     यावेळी सर्वात जास्त कामे अभियंत्यांना दिलेबद्दल  सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने कार्यकारी अभियंता मिरजकर यांचे पुष्पगुच्छ देऊन ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता मिरजकर यांनी पुढील कामवाटप सभेला आणखी कामे देऊन सुशिक्षित बेरोजगार यांच्या वाटणीचा लवकरात लवकर अनुशेष भरून काढणेची ग्वाही दिली. सदर कामवाटप बैठकीस कोल्हापूर सार्वजनिक मंडळ कार्यालयातुन जगदीश खाडे, तसेच सार्वजनिक बांधकाम मिरजचे कार्यकारी अभियंता मिरजकर उपस्थित होते.
सांगली मिरजेमध्ये अभियंतांची संख्या हजारामध्ये आहे. मिटींगला जवळपास १५० अभियंता उपस्थित होते. यावेळी विनानिविदा कामं फक्त २८ होती. यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजीचा सूर होता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.