प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे विभागीय सचिव मीनल कुडाळकर यांच्या सौजन्याने महाराष्ट्र महिला विकास मंचचा पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्र महिला विकास मंच ही महिलांनी महिलांसाठी चालवलेली राज्यस्तरीय संघटना असून या संघटनेमार्फत राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्री,आणि त्यागमूर्ती रमाई,या त्रिरत्नांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या कार्याला अनुसरून राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देशाच्या गौरवाचे कार्य करणाऱ्या युवतींना प्रत्येक वर्षी सन्मानित केले जाते.समाज सुधारकांची आठवण व त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीने घ्यावी व या स्त्रियांच्या हातून देशाची नवी पिढी घडावी यासाठी महाराष्ट्र महिला विकास मंच त्यांचा शाल सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,बुके आणि पुस्तके देऊन सन्मान करत असते.
महाराष्ट्र महिला विकास मंचचा दुसऱ्या वर्षीचा पुरस्कार सन्मान सोहळा दिनांक 17 जानेवारी रोजी संपन्न झाला.आमदार सुमनताई पाटील,संजय काका पाटील यांच्या सुविद्य पत्नी ज्योती काकी पाटील,ज्येष्ठ वक्ते प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव,महिला विकास मंचच्या कालिंदी पाटील संस्थापक अध्यक्षा विनिता दिवेकर प्रदेश उपाध्यक्ष,रेवती आढाव प्रदेश महासचिव,उज्वला साळवी प्रदेश सचिव मिनल कुडाळकर विभागीय सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 14 महिला-शितल साठे,एसीपी माया मोरे,आशा मोराजकर,छाया घारपुरे,दिपाली चांडक,संध्या कल्याणकर,काजल कांबळे,योगिता अमोल माने,नूतन पाटील,रेणुका गोंदकर,सुजाता कांबळे,योगिता रोहन माने,सह्याद्री कदम या महिलांना पुरस्कार देऊन हा पुरस्कार सन्मान सोहळा अतिशय उत्साही वातावरणात नियोजनबद्ध पद्धतीत संपन्न झाला.यावेळी आधुनिक युगातील लहानग्या जिजाऊ,सावू,रमाऊंनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली,या कार्यक्रमात लगेच नाशवंत होत असलेल्या फुले, हार यावरील अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्यकर्त्या सौ.मीनल कुडाळकर यांच्या संकल्पनेतून सांगलीची खासियत असलेली हळद,साखर आणि तासगावचा प्रसिद्ध बेदाणा यापासून तयार केलेला हॅन्डमेड बुके देण्यात आला होता.सांगली जिल्ह्याच्या महिलांसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र महिला विकासच्या विभागीय सचिव मीनल अविनाश कुडाळकर यांनी आत्तापर्यंत अनेक संस्थेच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य केले आहे.विधवा महिलांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शहर,तालुका,ग्रामपंचायत, स्मशानातील जुन्या रुढी,ठराव, विधवांसाठी हळदी कुंकू इ.सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम राबविण्यात आले.एक अनुकरणीय उपक्रम पुरस्कार सांगली जिल्ह्यात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेटके नियोजन जिल्हाध्यक्ष भारती पाटील,छाया जाधव,उल्का माने,शिला पाटील,सुजाता पाटील,छाया खरमाटे,आशा टिळे,वंदना कुडाळकर,गौरी बागलकोटे,रजनी रजपूत,यांनी केले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.