प्रतिष्ठा न्यूज

परसराम तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे- दांडीबहाद्दर मुख्याध्यापक व शिक्षक चौकशीअंती निलंबित- शिक्षण विभागाची कारवाई….

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा: – लोहा तालुक्यातील सुगाव केंद्राआंतर्ग येणाऱ्या  परसराम तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  मुख्याध्यापक ए.एस. चिद्रावार व सहशिक्षक एस.आर.गिरी हे दोघे 11ऑक्टोबर 2022 रोजी रजा न घेता व कार्यालयास माहिती न देता गैरहजर राहिल्याने या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.
गैरहजर राहण्यासोबतच शाळेतील रेकॉर्ड अद्यावत न ठेवणे, शालेय पोषण आहारात अनियमितता आदी आरोप या दोघांवर आहेत.
परसराम तांडा येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या 56 असून मुख्याध्यापक ए.एस.चिद्रावार आणि सहशिक्षक एस.आर.गिरी हे दोघेही 11ऑक्टोबर 2022 रोजी रजा न घेता केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, व गटशिक्षणाधिकारी कार्यालयास कसल्याही प्रकारची माहिती न देता शाळेत आले नाहीत. त्या दिवशी सर्व विद्यार्थी शाळेत वेळेप्रमाणे दाखल झाले. मात्र, शाळेत गुरुजीच आले नसल्याचे पाहून मुलांनी शाळेच्या प्रांगणातच अभ्यास सुरू केला. ही माहिती कळताच पालक जमा झाले. शालेय समिती अध्यक्ष जयपाल राठोड व सदस्य यांनी दोन्ही शिक्षक शाळेत गैरहजर असल्याची माहिती कापसी- बु. विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा फटाले यांना दिली असता त्यांनी दि 12 ऑक्टोबर 2022 रोजी प्रत्यक्ष येऊन शालेय व्यवस्थान समिती, व पालक यांच्या समक्ष पाहणी केली.व सविस्तर माहिती घेण्यात आली असता या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक हे नेहमीच शाळेत येत नसल्याची तक्रार समितीने केली असता मुख्याध्यापक चिद्रावर व सहशिक्षक गिरी यांनी उपस्थित शिक्षण विस्तार अधिकारी, शालेय समिती, व पालक यांना उर्मट भाषा
करत बोलू लागले.
हे शिक्षकांचे वर्तन पाहता हा चौकशी अहवाल शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा फटाले व सहाय्यक जी.एस. मंगनाळे यांनी लोहा पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडे पाठवला होता. येथून हा अहवाल नांदेड जि.प. शिक्षण विभागास पाठविला होता त्यांना मिळाल्यावर शिक्षण विभाग व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या शिक्षकावर निलंबन करण्याची  कारवाई केली.
दरम्यान या शाळेतील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन या शाळेत दुसऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकास प्रतिनियुक्तीवर  पाठविले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.