प्रतिष्ठा न्यूज

जिल्हा स्तरीय राज्यपुरस्कार स्काऊट- गाईड पूर्व चाचणी शिबीरास शिक्षणाधिकारी डॉ.सौ.सविता बिरगे यांची भेट*

प्रतिष्ठा न्युज/ जिल्हा प्रतिनिधी
नांदेड दि.16 :: स्काऊट गाईड राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबिराचे सोमवार दि.14/11/2022 ते मंगळावर दि.15/11/2022 पर्यंत दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात प्रवेश अभ्यासक्रम,ध्वजारोहण,गणवेश,स्वच्छता, प्रथमोपचार,पायोनियरिंग कृषी,खेळ, साहस याबाबत माहिती देण्यात आली.
               शिबीरास जि.प.  शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) डॉ.सौ सविता बिरगे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व चाचणी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा संघटक गाईड श्रीमती शिवकाशी तांडे यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले.
         या शिबीरास जिल्हा संघटन आयुक्त श्री जनार्दन इरले,सहा.जिल्हा आयुक्त श्री.आर.आर.फुलारी, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्री प्रलोभ कुलकर्णी,श्री विनोद सोनटक्के,हेमंत बेंडे, श्री पांडुरंग सोळंके यांचे मार्गदर्शन लाभले.
      यावेळी स्काऊटर श्री भोसले,श्री पाटील ,श्री राजू पवार,श्री पोलशेटवार,श्री मांजरे, गाईडर श्रीमती निलेवार श्रीमती डुकरे तसेच कार्यालयिन कर्मचारी श्री बनसोडे,श्री गुडलावार आदि जण उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.