प्रतिष्ठा न्यूज

पवार साहेबांना सोडून गेलेले पांढऱ्या कपड्यातील चोर, दरोडेखोर व बोके : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पवार साहेबांना सोडून गेलेले पांढऱ्या कपड्यातील चोर, दरोडेखोर व बोके आहेत अशी टीका राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ज्या पवार साहेबांनी आयुष्यभर बहुजन समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी आटोकाट प्रयत्न केले. ज्या पवार साहेबांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री व देशातील केंद्रातील अनेक मंत्रिपदे ही देशातील,राज्यातील,शेतकरी, शेतमजूर, काबाडकष्ट करणाऱ्या मजूर,कामगार यांच्या विकासासाठी प्रयत्न केले.सेक्युलर घटकांना एकत्र करून राज्याच्या प्रगती साठी प्रयत्न केले. 18 पगड जातीतील सर्वांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने रयतेच्या राज्य गेले त्याच पद्धतीने पवार साहेबांनी महाराष्ट्रातील तमाम विखुरलेल्या व कधीही कोणी न विचारणाऱ्या समाजाला एकत्र घेऊन महाराष्ट्र घडवला. आपल्याच घरातील आपल्या पुतण्याला त्याच्या बोटाला धरून राजकारणाचे धडे दिले आमदार केले,मंत्री केले, अनेक वेळा उपमुख्यमंत्री केले. अनेक वेळा मंत्री असताना व महत्त्वाचे खाते सांभाळत असताना महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह घोटाळा,सिंचन घोटाळा,व अनेक खात्यामध्ये झालेला 70 हजार कोटीचा घोटाळा,या घोटाळ्यामुळे पूर्ण राष्ट्रवादी व आदरणीय शरद पवार साहेब अडचणीत आले. मला माझे काका वाचवतीलच याच धाडसाने त्यांचे नाव घेऊन व त्यांचे नाव पुढे करून व त्यांच्याच नावावर ही उघड दरोडेखोरी केलेली आता उघड होऊ लागली आहे. आमदार मंत्री याची कवच घेऊन राज्य सरकारमधील अनेक मोठ्या खात्यामध्ये करोड रुपये च्या चोऱ्या केल्या,भ्रष्टाचार केला त्याचाच उलगड आता होऊ लागल्यामुळे व आपण आता स्वप्नात जेलची हवा खात आहे असे दिसत असल्याची जाणीव होतं असल्यामुळे व आपण केलेल्या मोठ्या चोऱ्या दरोडे या लपवण्यासाठीच भारतीय जनता पार्टीला साथ दिली त्यामुळे तमाम बारामतीकर व महाराष्ट्रातील लोकांचा विश्वास घात केला कधी शेतकऱ्यावरती गोळीबार तर, कधी शेतकऱ्यांनी पाणी मागितले म्हणून धरणात केलेली मुतायची भाषा केली, त्यामुळे प्रचंड उन्हामात माजलेल्या व सध्या सरकारमध्ये असलेल्या उप मुख्यमंत्री अजित दादा पवार व त्यांचे टोळके व टोळक्याचे म्होरके असलेले उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी आदरणीय पवार साहेबांना दगा देऊन, फितूर होऊन जातीवादी सरकारला पाठिंबा दिल्याने भविष्यकाळात नामदार अजित दादा ची महाराष्ट्रातून असणारी विश्वासार्हता संपलेली आहे व आपण केलेले करारनामे उघड होऊ नये म्हणूनच उपमुख्यमंत्री व अनेक भ्रष्टाचारी टोळक्याने मंत्री पदाची शपथ घेतली याची चर्चा सर्व महाराष्ट्रात होऊ लागले आहे. सरकारमधील महत्त्वाचे मंत्री असताना मंत्रालय जाळून त्या ठिकाणी नामदार अजित दादा यांनी स्वतःवर झालेले सिंचन घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्रे जाळण्याचा ही प्रयत्न केला. एवढी मजल यांची जात असेल तर ते कुठल्याही थराला जाऊ शकते हे त्याच वेळेला महाराष्ट्रातील जनतेने ओळखले होते म्हणून भविष्य काळात नामदार अजित दादा आणि त्यांच्या टोळीने पवार साहेबां बरोबर केलेला दगा याचा जाब भविष्यकाळात महाराष्ट्रातील जनता विचारल्याशिवाय राहणार नाही अशीही चर्चा होऊ लागली आहे. असे राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.