प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिका आणि एसटी महामंडळाकडून सांगली स्टँडवर स्वच्छता मोहीम : अर्धा टन कचरा झाला संकलित

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माजी वसुंधरा अभियान तसेच एसटी महामंडळाच्या स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत सांगली बस स्टँड वर स्वच्छता मोहीम घेण्यात आली. महापालिका आयुक्त सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली एसटीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे आणि एसटी स्वच्छता समितीचे सदस्य दीपक चव्हाण यांच्या नियोजनानुसार ही स्वच्छता मोहीम पार पडली. या मोहिमेत अर्धा टन कचरा संकलित करण्यात आला.
या मोहिमेंतर्गत सांगलीच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील शहरी बस वाहतूक स्थानकाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे , आगार व्यवस्थापक विजय मोरे, स्वच्छता समिती सदस्य दीपक चव्हाण, स्थानक प्रमुख शीतल माने , सर्व नियंत्रक, वाहतूक निरीक्षक नागावे व दीपक कलंबकर , मोहन सय्यद, दत्ता माळी तसेच चालक वाहक आणि एसटीतील स्वच्छता कर्मचारी यानी सहभाग घेतला. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ निरीक्षक युनूस बारगीर , मुकादम यांच्यासह मुकादम निवास साबळे व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन परिसर चकाचक केला. या मोहिमेत झाडी झुडपे आणि कचरा असा एकूण अर्धा टन कचरा संकलित करण्यात आला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.