संजयकाकांच्या विजयासाठी कवलापूरहून 14 किमी पायी प्रवास करून युवकाचे तासगावच्या गणरायाला साकडे
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या विजयासाठी तासगावच्या गणरायाला साकडे घालण्यात आले आहे. कवलापूरच्या सोमनाथ (आप्पा) घाटगे यांचे चिरंजीव सुदर्शन घाटगे या युवकाने बुधगाव कॉलेज ते तासगाव असा तब्बल 14 किलोमीटरच्या पायी प्रवास करत संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी गणरायाचे दर्शन घेतले.सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.या निवडणुकीत विजय मिळवून यावेळी हॅट्रिक करण्याच्या तयारीत ते आहेत. त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांकडून जीवाचे रान केले जात आहे.जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.संजयकाका पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
संजय काका पाटील यांच्यासमोर सध्या तरी तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांचा एकतर्फी विजय होईल,असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वीच धुसफूस सुरू झाली आहे.उमेदवारीवरून सुरू झालेला संघर्ष आता टोकाला गेला आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) सांगलीची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसची मोठी कोंडी केली.त्यामुळे संतप्त झालेल्या विशाल पाटील यांनी स्वतंत्रपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे मैदानात आहेत.निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याने संजयकाका पाटील यांचा विजय सोपा झाल्याचे बोलले जात आहेत.एकीकडे संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून जीवाचे रान केले जात असतानाच,दुसरीकडे कवलापूर येथील सुदर्शन सोमनाथ घाटगे याने बुधगाव कॉलेज ते तासगाव असा तब्बल 14 किलोमीटरचा पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाला पाटील यांच्या विजयासाठी साकडे घातले. आज सकाळी 6.45 ते 8.45 असा तब्बल दोन तास सुदर्शन यांनी हा 14 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. यावेळी तासगाव नगरीत सुदर्शन याचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.सोमनाथ घाटगे हे मूळचे राष्ट्रवादीचे आहेत.स्व.आर. आर.पाटील यांचे ते कट्टर समर्थक आहेत.तरीही त्यांचा मुलगा सुदर्शन याने भाजपचे संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी 14 किलोमीटरचा पायी प्रवास केला,ही विशेष बाब आहे.यावेळी भाजपचे माजी नगरसेवक अनिल कुत्ते,भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप सावंत,शिवनेरी कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष शीतल पाटील,विशाल भोसले,हेमंत गायकवाड,राजू लिंबळे,धनाजी घोलप,प्रसाद पैलवान,सुदर्शन पवार,अमोल पवार, समर शिंत्रे,अरुण माळी,यश लुगडे,दिग्विजय माने पाटील,सतीश माने,सायमंड जाधव, राहुल बाबर,राजेंद्र लिंबळे,साळुंखे खाडेवाडी आदी उपस्थित होते.