प्रतिष्ठा न्यूज

अखेर अवजड वाहतुकीस भुई बावडा घाट मार्ग सुरू

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : भुईबावडा घाट अखेर उद्यापासून अवजड वाहतुकीस खुला होणार आहे. तशा प्रकारचा निर्णय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जाहीर केला असून सहा चाकी वाहनांसाठी तूर्तास हा घाट चालू करण्यात येणार आहे. आमदार नितेश राणे यांनी मोबाईलवरून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. जिल्ह्यातील ट्रक चालक-मालक संघटनेने आमदार राणेंचे आभार मानले आहेत.
घाटमाथा व कोकण यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून करूळ घाटा प्रमाणेच भुईबावडा घाटाकडे पाहण्यात येते. सध्याचा हंगाम आंबा, काजू बागायदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा घाट मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असल्याने फार त्रास सहन करावा लागत होता.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.