प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे दि.9,10 आणि 11 मार्च रोजी ” शिवगर्जना ” महानाट्याचे आयोजन: सह कुंटुब,सह परिवारांनी नाटय पहावे – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे. नांदेड शहरात दि. ९, १० आणि ११ मार्च असे तीन दिवस हिंगोली गेट भागातील सर्कस ग्राऊंडवर या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले आहेत. हे महानाट्य सर्वांसाठी निःशुल्क असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित हे महानाट्य नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सूचना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची
माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी ३ प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहेत. कोणत्याही पासेस विना, प्रवेशिका विना प्रथम येणाऱ्याला प्रथम,मोफत उपलब्ध करून दिले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य
■ आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही
भाषेत ८५ प्रयोग
यशस्वीरित्या सादर केले आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या प्रमुख उपस्थितीतही हे महानाट्य
सादर झाले आहे.
या
महानाट्यात २५०
कलाकारासह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे.
प्राधान्य दिले जाणार आहे. महाराष्ट्राच्या भूमीतील प्रत्येकाने बघावा असा हा नाट्यप्रयोग सहकुटुंब बघण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वांना सादर निमंत्रित केले आहे.
■ तर १४० फूट लांब आणि ६० फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य
असणार आहे. शिवराज्याभिषेक
सोहळ्याला नेत्रदीपक
आतिषबाजीही केली जाणार आहे.
तसेच लोकनृत्य आणि
लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत इतिहास मांडण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता प्रयोगाला सुरुवात होणार आहे.
हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी वाहनतळ, रस्ते मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, बैठक सुविधा, जनजागृती आदींचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.