प्रतिष्ठा न्यूज

सौद्यात उधळलेल्या बेदाण्याच्या पैशातून व्यापारी वर्षाला लाखो रुपये कमवत आहेत : जोतीराम जाधव

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : बेदाणा सौद्यावेळी बेदाणा उधळण्यावर बाजार समिती चेअरमन, संचालक,सचिव,शेतकरी प्रतिनिधी व शेतकरी यांच्यात बैठक होऊन सौद्या वेळी उधळला जाणारा बेदाणा हा शेतकऱ्याच्या बॉक्समधून काहीच वजन कमी न करता उधळलेल्या बेदाण्या सह संपूर्ण बॉक्सचे वजन ग्राह्य धरले जावे असे ठरले असताना,सध्य स्तिथीला तसे होताना दिसून येत नाही,यासाठी अनेक वेळा बैठक आणि आंदोलन सुद्धा झाली आहेत त्यामुळे याबाबत एक महिन्यात निर्णय घ्यावा अन्यथा सौदे बंद पाडण्याचा इशारा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे तासगाव तालुकाध्यक्ष ज्योतीराम जाधव यांनी तासगाव बाजार समितीचे मुख्य प्रशासक सौ. उर्मिला राजमाने यांना निवेदन देऊन इशारा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की यार्ड मधील व्यापारी आणि स्टोरेज मालक काही वेळेला दोन नंबरची माले,एक दोन बॉक्स असणारा बेदाणा सौद्याला न आणता परस्पर विक्री दाखवून स्वतः नावे करून तो माल नंतर विकतात हा व्यवहार किरकोळ वाटत असला तरी हा भ्रष्टाचारच आहे.किरकोळ एक दोन बॉक्स साठी शेतकरी सौद्याला येत नाही तसेच सौद्याला वेळ पुरत नाही अशी कारणे व्यापारी देतात यासाठी आठवड्यातून तीन दिवस चालणारे सौदे हे चार दिवस करावेत. तसेच बेदाण्याचा अंगणवाडी मुलांच्या पोषण आहारात समावेश करण्यासाठी प्रयत्न व्हावेत,तसेच बाजार समितीच्या व पणन महामंडळाच्या माध्यमातून द्राक्ष व बेदाणा जास्तीत जास्त लोकांनी खाण्यासाठी त्याची जाहिरात करावी, सर्व कोल्ड स्टोरेज ऑनलाइन करून ते बाजार समितीला जोडून कोणत्या स्टोरेजवर किती माल शिल्लक आहे याची माहिती बाजार समितीच्या दर्शनी भागात डिजिटल द्वारे प्रसारित करण्यात यावी,शिवाय शेतकऱ्यांकडून स्टोरेज भाडे प्रतिवर्षी प्रति टन सहा हजार व जीएसटी 18% घेतली जाते ती रद्द करण्यास बाजार समितीने प्रयत्न करावेत असेहि निवेदनात म्हटले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष वीरेंद्र राजमाने,सांगली अध्यक्ष संजय व्हनखडे,वाळवा अध्यक्ष जितेंद्र ढबू,मोहन गवळी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.