प्रतिष्ठा न्यूज

श्रीनगरच्या लाल चौकात पहिल्यांदाच मराठी गलाई बांधवानी काढली गणरायाची भव्य मिरवणूक

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : श्रीनगर येथे मराठी गलाई बांधव गेल्या पंचवीस वर्षांपासून श्रीनगर गणेश सेवा मंडळाच्या माध्यमातून श्री गणपतीची स्थापना करत आहेत.1999 पासून सुरू असलेली ही परंपरा अजूनही सुरूच असून यावर्षी मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाल्याने मोठया उत्साहात गणपती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी स्थानिक मुस्लिम बांधव,तसेच परप्रांतीय नागरिकांनीही कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.यावेळी पहिल्यांदाच पंजाब मधील बँड ताशा पथक आणून भव्य मिरवणूक पंचमुखी हनुमान मंदिर ते लाल चौक घंटाघर पर्यंत काढण्यात आली.मिरवणुकीनंतर श्री गणेश मूर्तिचे झेलम नदीत विसर्जन करण्यात आले.यावेळी महाप्रसादही ठेवण्यात आला होता.गलाई बांधव चंद्रकांत जाधव,धनाजी हसबे,लक्ष्मण हसबे,मानिक पाटणकर,विजय साळुंखे,पवन मुळीक,स्वप्नील जाधव (सोनू ), सागर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.