प्रतिष्ठा न्यूज

कारदगा येथील 26 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दि. बा पाटील.

प्रतिष्ठा न्यूज
इस्लामपूर 21 : कारदगा जिल्हा बेळगाव या सीमा भागातील साहित्य विकास मंडळ ही संस्था गेली पंचवीस वर्षे सातत्याने मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करून मराठी भाषा व संस्कृतीचे
संवर्धन करते आहे या संस्थेने 26 व्या
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक दि.बा पाटील- कामेरी यांची निवड केली आहे
दि.बा पाटील यांचे साहित्य क्षेत्रातील आजवरचे योगदान लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश काशीद, उपाध्यक्ष सुनीता कोगले, सुचित बुडके, सुभाष ठकाने, प्रकाश भागाजे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कामेरी तालुका वाळवा येथे येऊन त्यांना अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र दिले. या संमेलनाचे उद्घाटक पुणे आयकर आयुक्त व शिराळ्याचे सुपुत्र अभिनय कुंभार हे आहेत. संमेलनास माजी आमदार कल्लाप्पाण्णा आवाडे, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, डॉ .सुनील कुमार लवटे, आ. प्रकाश रावजी हुक्केरी आ गणेश हुक्केरी आ. शशिकला जोल्ले कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार सुभाष जोशी,काकासाहेब पाटील, गावच्या सरपंच सौ सुजाता वड्डर, यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हे साहित्य संमेलन सीमा भागातील सर्वात जुने व महत्त्वाचे संमेलन समजले जाते दि. बा यांच्या निवडीबद्दल जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.