प्रतिष्ठा न्यूज

आदिशक्ती महिला पतसंस्थेचा स्ववास्तु स्थलांतर कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
कराड : (दि 24, प्रतिनिधी) : आदिशक्ती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे नव्याने बांधलेल्या स्ववास्तूत स्थलांतर केले. त्यानिमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा व ‘आई समजून घेताना’ या विषयावर प्रा. लता ऐवळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक सहकारी संस्था कराडचे मा. श्री संदीप जाधव हे होते. आपल्या ओघवत्या काव्यमय शैलीत प्रा. लता ऐवळे यांनी आईशी असलेल्या नात्याचे विविध पदर उलगडून दाखवले. आपली मुले कर्तुत्ववान घडावित म्हणून प्रत्येक आई अपार कष्ट घेत असते. निराधार वृध्दांना आधार देणाऱ्या समाजसेवी पुरुषांमध्येही एक प्रेमळ आई जिवंत असते. असे आईबद्दलचे अनेक पैलू अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी मांडले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. श्री संदीप जाधव यांनी महिला सबलीकरणाय अर्थकारणम् या पतसंस्थेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ उलगडून पतसंस्थेचे कौतुक केले. पतसंस्थेने उतर्रोत्तर अधिक प्रगती करावी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. आदिशक्ती पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. उज्वला प्रल्हाद पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या ध्येय धोरणाविषयी व आजपर्यंतच्या वाटचालीविषयी माहिती दिली. गरजू महिलांना अर्थसहाय करताना संस्थेने ठेवीदारांचे हित कायमच जोपासले. संस्थेने आता स्ववास्तुमध्ये स्थलांतर केले आहे यांचे श्रेय सर्व सभासद व हितचिंतकांचे आहे असे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. विजया प्रभाकर भोसले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी पाटील यांनी केले. या आनंद सोहळ्यासाठी सभासद व महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. या कार्यक्रमासाठी सौ. नीता जयंत पाटील, माजी सरपंच बनवडी, सौ. प्रभावती माळी, श्री रोहित राव, डॉ. पी. आर. पाटील, श्री सी. ए. पवार, सौ. हरदास तसेच संस्थेच्या संचालिका अँड. मैत्रेयी कुलकर्णी, प्रा. राधिका पवार, सौ. संगिता बानगुड, डॉ. अस्मिता फासे, सौ. मीना राव, प्रा. रेखा पाटील, सौ. सुरेखा वेदपाठक, श्री.कमलेश पाचुपते, सौ.उज्वला पाटील आणि श्री. विजया भोसले आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.