प्रतिष्ठा न्यूज

सिंहगड पंढरपूरच्या ३ विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरीय आविष्कार २०२२ मध्ये पारितोषिक

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी महामहिम राज्यपाल डॉ एस एम कृष्णा यांच्या प्रोत्साहनामुळे सन २००६ पासून प्रतिवर्षी अविष्कार ही संशोधन प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात येते.
ग्रामीण आणि शहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे हे उद्दीष्ट ठेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रतिवर्षी आविष्कार हा उपक्रम राबवित असते. यावर्षी बार्शी येथील एम आय टी महाविद्यालय येथे विद्यापीठस्तरीय आविष्कार २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांनी ६ प्रवर्गातून, पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अशा एकूण ३ स्तरावर सहभाग नोंदविला होता, त्यातून अनुक्रमे कु. मनोज लोकरे व कु. युवराज पवार (प्रीपेड एनर्जी मीटर) यांना कॉमर्स, लॉ आणि मॅनेजमेंट या प्रवर्गातून पदवी स्तरावरील द्वितीय पारिोषिक, श्री आशिष जोशी यांना बायोमेडिकल इमेज मॉडेलिंग अँड अनालीसिस ऑफ फिमर बोन या विषयाला पोस्ट पी जी (पी एच डी) स्तरावरील द्वितीय पारितोषिक व कु. सुदर्शन मकर यांना पंढरीची वारी या अँड्रॉइड ॲप साठी पदवी स्तरावरील द्वितीय पारितोषिक मेडीसिन अँड फार्मसी प्रवर्गातून प्राप्त झाले अशी माहिती समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना नेहमी प्रयोगशीलतेसाठी प्रोत्साहित करणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ संपत देशमुख, डॉ बाळासाहेब गंधारे, समन्वयक प्रा गणेश लकडे, एनक्यूबेशन विभागप्रमुख प्रा. अतुल आराध्ये, प्रा. राहुल शिंदे, प्रा. राहुल घोडके, प्रा. रमेश येवले, प्रा. किशोर जाधव, प्रा. अंजली पिसे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. यशवंत पवार, सर्व विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.