प्रतिष्ठा न्यूज

तासगावात वंचितचा पदाधिकारी मेळावा,तिसऱ्या आघाडीची नांदी… महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे आयोजन..सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सध्या आरक्षण आणि जाती-पातीचे राजकारण केलं जात आहे,परंतु सामान्य माणसाना  जीवनावश्यक अनेक समस्यांनी ग्रासले असून जनतेच्या प्रश्नाकडे  सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.येणाऱ्या काळात संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तिसरी आघाडी करून निवडणुकीला सज्ज व्हावे,असे सांगून आरक्षणाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून फक्त निवडणुकी पुरताच उपयोगात आणला जातोय.मराठा आणि ओबीसी यांनी येत्या काळात एकत्र  परिषद घेऊन भूमिका मांडली पाहिजे. असे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष  संजय विभुते यांनी बोलताना स्पष्ट केले.वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त तासगाव येथे रक्तदान शिबिर व पदाधिकारी स्नेह मेळाव्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.संजय विभुते पुढे म्हणाले की “लोकशाही राज्यात हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरु आहे.हे ओळखून जनतेन जागरूक  राहील पाहिजे.सर्वसामान्य जनतेला अनेक योजनेचा लाभ मिळत नाही, येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकत्रितपणे काम केल्यास लोकांच्या हिताच सरकार येईल असे सांगून एकत्रित काम करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा.सोमनाथ साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी वह्या,शालेय साहित्य  रोपे भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते  रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्र  देऊन सन्मान करण्यात आला. स्नेहमेळाव्याच्या निमित्याने तासगावातील वंचितच्या व्यासपीठावर  विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.यावेळी सर्वच नेत्यांनी
भाजपच्या कारभाराचा चांगलाच  पाढा वाचत आगामी निवडणुकांसाठी एकत्रित आघाडीचे संकेतच दिले. यामुळे राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
जाती -पातीचे आरक्षणाचे राजकारण घडवून सामान्य कार्यकर्त्यांची डोके भडकवली जातात आणि राजकीय सार्थ साधला जातो हे आता आपण थांबवलं पाहिजे असे सांगून  समविचारी राजकीय पक्षांनी एकजूट करून एकाधिकारशाहीला चोख उत्तर दिले पाहिजे.वंचित बहुजन आघाडीचे  प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान आणि घटनेच्या माध्यमातून चांगली वाटचाल सुरू आहे.सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीशी सहकार्याची भूमिका घेतली आहे.
असे मत सरपंच परिषदेचे अध्यक्ष  प्रदीप माने यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी ओबीसी नेते अरुण खरमाटे बोलताना म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांचे जाळे तासगाव तालुक्यात चांगल्या पद्धतीने रुजवून समाजातील सामान्य घटकांना न्याय देण्यासाठी एकत्रपणे काम करू असे ग्वाही त्यांनी दिली. प्रा.सोमनाथ साळुंखे बोलताना म्हणाले की ” श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन वाटचाल सुरू आहे,चांगला विचार घेऊन काम करताना अनेक चांगल्या माणसांची  यादी सोबत आहे याची प्रचिती आज वाढदिवसानिमित्त आली.आपल्या सर्वांच्या प्रेमाबद्दल ऋणी आहे.
मेळावाप्रसंगी जिल्हा नाभिक महामंडळाचे जयवंत सूर्यवंशी, शिवसेना ठाकरे गटाचे संजय विभुते, सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप माने, अरुण खरमाटे, काँग्रेसचे  महादेव नाना पाटील,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे चंद्रकांत गायकवाड, तालुकाध्यक्ष राजू काळे,सनी गायकवाड, राहुल माळकर,संजय माळी, प्रहार संघटनेचे  राहुल कलाल आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
वंचितचा पदाधिकारी मेळावा, तिसऱ्या आघाडीची नांदी !
वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने वंचितचे   जिल्ह्यातील विविध कमिट्यावर काम करणारे पदाधिकारी सहभागी झाले होते. या मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रमावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष  संजय विभुते,राष्ट्रीय काँग्रेस आयचे  तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष प्रदीप माने- पाटील,ओबीसी संघटनेचे अरुण खरमाटे,नाभिक महामंडळाचे अध्यक्ष जयवंत सूर्यवंशी,प्रहार संघटनेचे  तसेच बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी ठळकपणे व्यासपीठावर  उपस्थित होते.यामुळे तासगाव तालुक्यात पार पडलेल्या मेळाव्यातून  चिंचणी- अंजनीला पर्यायी राजकारणाची नांदी ठरणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.