प्रतिष्ठा न्यूज

23 जानेवारी रोजी ऑनलाईन परीक्षा विरोधी विद्यार्थ्यांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- सर्व युवक युवती विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातुन वर्षानुवर्षे अभ्यास करून आपली गुणवत्ता सिद्ध करून हक्काचा रोजगार धडपडणाऱ्या तरूणाईचा TCS, IBPS, MKCL या खाजगी कंपन्याद्वारे पदभरत्यांचे आयोजन करूण भविष्य उध्वस्त करण्याचा घाट महाराष्ट्र शासनाने घातला आहे, तो आपण हानुन पाडून सर्वच परीक्षा MPSC आयोगा मार्फत घेण्यास भाग पाडण्यासाठी ऑनलाईन परीक्षा विरोधी आक्रोश महामोर्चाचे आयोजन दि.23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता केले आहे, तरी सर्व विद्यार्थी युवक/युवती व पालक यांनी या मोर्चात मोठया संख्येने सहभागी होऊन शासनास धडा शिकवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
                       – प्रमुख मागण्या –
(1) (IBPS/TCS) या खाजगी ऑनलाईन कंपन्या द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्वच विभागातील पदभरती प्रक्रिया रद्द करून निवडणूक पूर्व कालावधी तात्काळ MPSC आयोगामार्फत घेण्यात याव्यात. (2) तलाठी व इतर विभागातील सरळ सेवा पदभरतीत झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी. (3) नुकत्याच जाहीर केलेल्या पोलीस भरतीचे आयोजन फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात यावे.(4) शिक्षक भरती एकाच टप्प्यात 67 हजार रिक्त पदे भरण्यात यावी व इंग्रजी माध्यमांचे मराठी माध्यमावरील अन्यायकारक प्रसिद्धीपत्रक तात्काळ रद्द करण्यात याव. (5) मध्यप्रदेश / राजस्थान या राज्यांच्या धरतीवर पेपरफुटीवर महाराष्ट्रातही कडक कायदा करून फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी. (6) राजस्थान / मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर परीक्षाशुल्क स्मार्ट कार्ड योजना महाराष्ट्रात राबवून विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्का मधून होणारी आर्थिक पिळवणूक तत्काळ थांबविण्यात यावी.(7) राज्यातील कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळांचे सामूहिकरण थांबवण्यात येऊन, जिल्हा परिषद शाळा सक्षम करण्यात याव्यात. (8) MPSC/UPSC/ पुर्व मुख्य SSC व इतर केंद्रीय परीक्षांचे परीक्षा केंद्र नांदेड शहरात देण्यात यावे. (9) सारथी, बार्टी, महाज्योती दोन्ही चाळणी परीक्षेत अनुक्रमे संभाजीनगर / नागपूर परिक्षेत गोंधळ झाल्याने संबंधित सर्व संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून सरसकट फेलोशिप देण्यात यावी. (10) सर्व विभागातील पदभरतीमध्ये कोरोना कालावधीतील दोन वर्षे वयोमर्यादा शिथिलतेचा GR ची मुदत वाढवुन 2024 पर्यंत संधी देण्यात यावी. (11) महावितरण विभागात होत असलेल्या पदभरतीत सहाय्यक/कनिष्ठ अभियंता उमेदवारांना यांना वय व अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करून स्थानिकांना प्राधान्य देण्यात याव तसेच गेट परीक्षा रद्द करण्यात यावी. (12) कर्नाटक राज्याच्या धर्तीवर (UBI) बेरोजगार भत्ता महाराष्ट्रात तात्काळ सुरू करण्यात यावा. (13) प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी. तेव्हा सर्वांनी या आक्रोश महामोर्चात मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन- ऑनलाईन परीक्षा विरोधी, कृती समिती नांदेड, यांनी केले आहे.
दि.23 जानेवारी 2024 रोज मंगळवार वेळ: सकाळी 9:30 वाजता स्थळः महात्मा फुले पुतळा (ITI) कॉर्नर ते जिल्हाधीकारी कार्यालय, नांदेड.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.