प्रतिष्ठा न्यूज

मणेराजुरीच्या पोस्टऑफिसचा कारभार फक्त एका कर्मचाऱ्यावर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : 18000 लोकसंख्या असणाऱ्या मणेराजुरी गावातील पोस्ट ऑफिसचा कारभार सध्या फक्त एका कर्मचाऱ्यावर सुरु असून पोस्टाची कामे होण्यास विलंब होत असल्याने गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत पोस्ट खात्याने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.सध्या पोस्ट ऑफिस मध्ये लाडकी बहीण या योजनेचें खाते उघडण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत असून या महिलांच्याकडून कर्मचाऱ्याविना असलेल्या या पोस्टाचे गेल्या चार दिवसापासून वाभाडे काढणे सुरू आहे.याबाबत मणेराजूरीची ग्रामपंचायत आक्रमक झाली असून ग्रामपंचायतीने थेट सांगलीच्या पोस्ट ऑफिसला कर्मचारी वाढवा म्हणून मागणी केली आहे.याबाबत ग्रामपंचायतने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मौजे मणेराजुरी हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून सदर गावची लोकसंख्या १८ हजारच्या आसपास असून सध्यस्थितीला महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना सुरु असून सर्व योजनेसाठी महिलांना खाती काढणे गरजेचे असून सदर खाते काढणे कामी मणेराजुरी येथे आपल्या पोस्ट ऑफिस मध्ये फक्त दोनच स्टाफ असून महिला वर्गाची अत्यंत गैरसोय होत आहे. आपल्या पोस्ट ऑफिस मणेराजुरी सब ऑफिस अंतर्गत मणेराजुरी, गव्हाण,वज्रचौंडे,योगेवाडी,करोली (M), सावर्डे इ.गावे येत असून सदरच्या कारभारासाठी फक्त आज दिनांक १८/०७/२०२४ रोजी फक्त दोनच कर्मचारी उपस्थित आहेत. तसेच एक कर्मचारी गेले अडीच महिने रजेवर असलेचे सांगितले जात आहे.तरी आज रोजी जवळपास १०० महिला कार्यालयाबाहेर सकाळी ८ वाजलेपासून रांगेने उपस्थित आहेत. दुपारी ४.०० वाजले तरी एका ही महिलेचे खाते काढण्यात आले नाही. तरी मोठ्या प्रमाणात महिला भगिनीची गैरसोय होत असून सदर ठिकाणी तात्काळ स्टाफ वाढविण्यात यावा,तसेच सदरचे पोस्ट ऑफिस दुसऱ्या मजल्यावर आहे.त्यामुळे वयस्कर तसेच दिव्यांग व्यक्तींचे हाल होत आहे.तरी सदर पोस्ट ऑफिसची जागा बदल करावी.या निवेदनावर सरपंच सारिका जमदाडे,उपसरपंच बाळासाहेब पवार,ग्रामसेवक विनय थोरवत यांच्या सहया आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.