प्रतिष्ठा न्यूज

परशुराम’ मध्ये आनंदमेळा व्यक्तिमत्व विकसन शिबिराला उत्साहात सुरुवात

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा येथील परशुराम विद्यामंदिर आणि कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांसाठी आनंदमेळा व्यक्तिमत्व विकसन शिबिर उत्साहात सुरू झाले. गगनबावडा ग्रामपंचायत च्या सरपंच मानसी कांबळे यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुस्ताक वडगावे, सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक दिगंबर गिरीबुवा तर आभार शीतल पत्रावळे यांनी मानले. मुख्याध्यापक रंगराव गोसावी आणि समन्वयिका आम्रपाली देवेकर यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनाखाली तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात गायन, नृत्य, अभिनय, कवायत एरोबिक्स, प्रेरणादायी व्याख्यान इत्यादी भरपूर उपक्रम घेतले जाणार आहेत. बाबा नदाफ व त्यांचे सहकारी यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.