प्रतिष्ठा न्यूज

महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत – आमदार सुमनताई पाटील यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज दि.१५ : येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी या जयंती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तासगावच्या विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना सुमनताई पाटील म्हणाल्या की,सर्व समाज घटकांना एकत्रित आणून महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवावा असे प्रतिपादन केले.
यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सविंधानामुळेच एकात्मता टिकून आहे व येणाऱ्या काळात सर्व समाज घटकांनी एकत्रित येऊन वाटचाल करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले,
यावेळी या कार्यक्रमास मा. जि. प. सदस्य किशोर दादा उनउने, इमाम रिहान सहाब, जि. प सदस्य सागर पाटील, ताजुद्दिन तांबोळी,राजू सावंत,अनिल थोरात,दिपक उनउने,शिंदे सर,सदाशिव धेंडे, ऍड.मिलिंद धेंडे,संजय थोरात, यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास शिदगोंड बापू पाटील,प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद कोळी, अर्चना धेंडे, शोभा सुतार, राजेश गायकवाड राहुल कलाल, विश्वास निकम, राजू कलाल, यासह मुस्लिम समाजातील सर्व मान्यवर, अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, उमाजी नाईक मंडळाचे सर्व कार्यकर्ते, मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन तासगाव तालुका आर पी आय अध्यक्ष प्रवीण धेंडे, समस्त बौध्द समाज विश्र्वशांती बोद्ध विहार अध्यक्ष महावीर धेंडे व जयंती कमिटी अध्यक्ष साहिल भिसे, यांनी केले. आभार अमित देवकुळे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.