प्रतिष्ठा न्यूज

धनंज बु.येथे कर्जबाजारी शेतकऱ्याचा मुलगा रोकडेश्वर शिंदे यांची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील धनंज बु अल्पभूधारक शेतकरी असलेल्या व घरातील कर्ता तरुण असलेल्या एका 23 वर्षीय शेतकऱ्याच्या मुलाने सततची नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.14 एप्रिल 2023 रोज शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की धनंज बु. येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी व्यंकटी शिंदे यांच्यावर‌ मारतळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे पीक कर्ज 1 लाख 25 हजार एवढे होते तर घर बांधकामासाठी म्हणून मनिपुरम गोल्ड लोन या खाजगी फायनान्सचे 5 लाख रूपये कर्ज थकीत होते‌. मयत रोकडेश्वर बालाजी शिंदे वय‌ 23 हा घरातील कर्ता तरुण व कारभार पाहणारा मुलगा होता वर्ष हेच‌ घरातील घर प्रमुख म्हणून कारभार पाहत होता. परंतु सततची नापिकी व बँकांचे कर्ज कसे फेडायचे या विचारात रोकडेश्वर असायचा या निराशेतूनच त्याने दि‌.14 एप्रिल 2023 रोज‌ शुक्रवारी सकाळी जेवण करून मी बाहेर गावाला जात आहे म्हणून घरच्यांना सांगून घरा‌ बाहेर गेला व‌ गावच्या पश्चिम दिशेला असलेल्या स्वतःच्या शेतातील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून घेतली त्यानंतर मयत रोकडेश्वर यांचे वडील बालाजी शिंदे हे नेहमीप्रमाणे जेवण करून शेतातील शेतमशागतीचे काम करण्यासाठी शेतात आले असता त्यांना आपला मुलगा झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच त्यांनी एकच हंबरडा फोडला असता ही माहिती बाजूच्या शेतकऱ्यांना कळताच‌ त्यांनी ही माहिती गावातील ‌नागरिकांना माहिती दिली. मयत रोकडेश्वर ‌हा अविवाहित होता. त्याचे पश्चात आई, वडील,1 भाऊ, व विवाहित 1बहीण आहे. प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.