प्रतिष्ठा न्यूज

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष-चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथे दोन दिवसीय भाजपा रुग्ण मित्र सेवा प्रशिक्षणाचा भव्य शुभारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष- चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा रुग्ण मित्र सेवा अभियानाचे संयोजक डॉ.अजित गोपछडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य दूत रामेश्वर भाऊ नाईक यांच्या समन्वयातून भाजपा रुग्ण मित्र सेवा प्रशिक्षणाचा भव्य शुभारंभ- डॉ.बाळासाहेब हरपळे यांचे हस्ते दि.11जानेवारी 2024 रोजी करण्यात आला.
भाजपा रूग्ण मित्र सेवा अभियान राज्यातील प्रत्येक
ग्रामपंचायतीला दोन, नगर परिषद, नगरपालिका व महानगर पालिका, प्रत्येक वार्ड निहाय दोन रूग्ण मित्र सेवा संपूर्ण महाराष्ट्रात सेवा देणार आहेत या दोन दिवसीय प्रशिक्षण अभियांनाचा भाजपा रुग्ण मित्र सेवा अभियानांतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासपूर्वक मार्गदर्शन- डॉ. बाळासाहेब हरपळे (भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश अध्यक्ष) डॉ स्वप्नील मंत्री (भाजपा वैद्यकीय आघाडी मुख्य प्रवक्ता तथा प्रदेश समन्वयक) शुभदा कामत (भाजपा वैद्य आघाडी पश्चिम महाराष्ट्र सहसंयोज) डॉ. राहुल कुलकर्णी (भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक) डॉ.सुनिल चव्हाण (नॅचरोपॅथी प्रदेश संयोजक) -डॉ. प्रिती मानमोडे (प्रदेश सहसंयोजक वैद्यकीय आघाडी म.रा. भाजपा) डॉ.भालचंद्र ठाकरे (प्रदेश संयोजक, भाजपा वैद्यकीय आघाडी होमिओपॅथी विंग) डॉ. विष्णु बावणे (राज्य समन्वयक भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र राज्य)
यांनी मार्गदर्शन केले.
तर समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ अजित गोपछडे (प्रदेश उपाध्यक्ष भाजपा रुग्ण मित्र अभियान संयोजक महाराष्ट्र राज्य) संजय भाऊ कौडगे (मराठवाडा विभागीय संघटनमंत्री), देविदास राठोड (प्रदेश सचिव भाजपा) श्रीकांत दुबे (भाजपा केमिस्ट अँड फार्मासिस्ट संयोजक महाराष्ट्र) दिलीप कंडकुर्ते (महानगराध्यक्ष भाजपा) संतुकराव हंबर्डे (जिल्हाध्यक्ष भाजपा) डॉ. सचिन उमरेकर (प्रदेश सहसंयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी) डॉ. प्रसाद डोंगरगावकर(प्रदेश समन्वयक भाजपा वैद्यकीय आघाडी) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना खा. प्रतापराव पाटील म्हणाले की तळागाळातील लोकांपर्यंत रुग्ण मित्र सेवा उत्तम व समर्पित भावनेतून मिळावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 21 शतकातील भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी व निरोगी भारत निर्माण करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व रूग्ण मित्र सेवा यांनी समन्वयामधून सेवा करावी असे ते मनोगतात म्हणाले.
मराठवाडा विभागीय संघटन मंञी संजय कौडगे यांनी सर्व भाजप रुग्ण मित्र सेवांनी ग्रामपंचायत स्तरावर रुग्ण सेवा देऊन देशसेवा करावी असे सूचक वक्तव्य केले.
तर रुग्ण मित्र सेवा अभियानाचे संयोजक- डॉ.अजित गोपछडे यांनी आपल्या मनोगतात उपमुख्यमंञी- देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व प्रदेशाध्यक्ष- चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागातील गोरगरीब “रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” याचा महाराष्ट्राला हेवा वाटावा असे काम रुग्ण मित्र सेवा करेल व संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करून प्रत्येक जिल्ह्यात भाजप रुग्ण मित्र सेवा अभियान प्रशिक्षण वर्ग आयोजित करून महाराष्ट्रात पन्नास हजार प्रशिक्षित रुग्ण मित्र सेवा साखळी निर्माण करून नमोअँप बद्दल सर्वाना मार्गदर्शन केले.
यावेळी या भव्य कार्यक्रमाचे आयोजक- डॉ.सदाशिव धाबे यांनी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवराचे व डॉक्टर यांचे आभार मानले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. माधव कटके, डॉ.संगीताताई पाटील, डॉ.गव्हाणे, डॉ. बाळासाहेब देशमुख, डॉ.संतोष जमदाडे, डॉ.संजय पटेल, डॉ.विठ्ठल बागुल, डॉ.प्रकाश कुरे, डॉ.निवृत्ती ईगोंले यांनी परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.