प्रतिष्ठा न्यूज

गावातील प्राथमिक शाळाच पिढ्या घडवतात पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : वासुंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन तसेच कलाविष्कार 2024 हा कार्यक्रम शुक्रवारी मोठया उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ होते, यावेळी त्यांनी उपस्थित पालकांना प्राथमिक शाळेचे महत्व पटवून दिले.प्राथमिक शाळा या पिढ्या घडवतात,आज आम्ही उभे आहोत हे फक्त प्राथमिक शाळेतल्या शिक्षणातूनच पुढे आलो आहोत खऱ्या अर्थाने प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या मध्ये कलागुणांना वाव असतो,आणि त्या सगळ्याची जोपासना करण्याचे काम प्राथमिक शाळा करते.ग्रामीण भागातल्या शाळा टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत,यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.शाळेच्या यशस्वी कामगिरीबद्दल माहिती घेत असताना नक्कीच शाळेचं,सर्व शिक्षकांचे,गावातील ग्रामस्थांचे, पालकांचे,ग्रामपंचायतचे कौतुक करावं तितके कमी आहे,शाळेचा नावलौकिकाचा आलेख असाच दिवसेंदिवस वाढत राहो असे गौरवोद्गार वाघ साहेबांनी काढले. त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सरपंच जयंत पाटील,माजी सभापती मायाताई एडके,उपसरपंच सौ नेहा शीतल हाक्के,ग्रा.प.सदस्य बाळासाहेब एडके,तंटामुक्त अध्यक्ष उमेश एडके, ग्रा.प.सदस्य विकास मस्के,ग्रा.प. सदस्य संतोष एडके,ग्रा.प. सदस्य भाऊसाहेब आवळे सामाजिक कार्यकर्ते शीतल हाक्के,सोसायटी संचालक अमर पांढरे,तंटामुक्त समिती उपाध्यक्ष मा.संभाजी थिटे,मा.सुभाष आण्णा खराडे,मा.संभाजी मोरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन अवघडे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा.डी.एस.पाटील, मा.मुक्ता गुरव, मा.मनीषा पांढरे,दिगंबर चव्हाण,सुरेश चव्हाण,अमित कामत,ज्योती थिटे,सारिका थिटे,हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक मा.नवनाथ पोळ सर,व मा.सुनीता एडके मॅडम यांनी केले.मुख्याध्यापक मा.विजया पवार तसेच शिक्षक वर्ग,त्याच बरोबर गावातील पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.