प्रतिष्ठा न्यूज

विकसित भारत संकल्प रथाचे स्टेशन चौक येथे स्वागत शेकडो नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने सांगलीमध्ये दाखल झालेल्या संकल्प यात्रेचे स्वागत स्टेशन चौक येथे स्वागत करण्यात आलं. यानिमित्त स्टेशन चौक येथे आयोजित विविध शासकीय योजनांच्या स्टॉलला शेकडो नागरिकांनी भेटी देऊन लाभ घेतला. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 19 जानेवारी पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा सुरू राहणार आहे.

आज रविवारी सकाळी दहा वाजता स्टेशन चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, माजी नगरसेविका सुनंदा राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत, संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य सुरेखा मोरे , भाजपा पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांच्यासह महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ.प्रथमेश पाटील, नगर अभियंता भगवान पांडव, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, वैभव कुदळे, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, महापालिकेचे ब्रँडअँबेसिडर दीपक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान दुपारी आमदार सुधीर गाडगीळ यांनीही सदर ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी सहायक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, नगरसचिव चंद्रकांत आडके, कामगार अधिकारी विनायक शिंदे, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपाचे श्रीकांत शिंदे, रेखाताई इंगळे, रोहिणी मंगल, अरविंद कार्वेकर, , गणपती साळुंखे आदीं उपस्थित होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते आयुष्यमान कार्ड पात्र लाभार्थी याना कार्डचे वाटप करण्यात आले.
दरम्यान उद्या सोमवारी शास्त्री चौक मिरज आणि दुपारी 3 वाजता रेल्वे स्टेशन मिरज येथे विकसित भारत संकल्प यात्रा येणार असून यानिमित्त विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावणेत येणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.