प्रतिष्ठा न्यूज

तासगाव हाय का *धुळ* गाव धुळीमुळे दुकानदार,नागरिक त्रस्त

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावच्या रस्त्यांवरील खड्डे,ड्रेनेजसाठी केलेली खोदाई व पावसाचे पाणी वाहून जाऊन रस्त्यावर आलेली माती यामुळे उडणारी धूळ या परिस्थितीत आता पडलेले खड्डे मुजवायच कामं  सुरू झाल्यानंतर धुळीत आणखी भर पडत आहे.काही ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या खडीमुळे तर काही ठिकाणी खुदाईमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे.शहरातील प्रचंड वाहतूक आणि जाणाऱ्या येणाऱ्या वाहणामुळे रोडवरील दुकानदारांना,नागरिकांना या धुळीचा सामना करावा लागत आहे.रस्त्यांवर वाहन काही मिनिटे जरी थांबवले तर त्यावर धुळीचा थर साचत आहे.श्वसनातून किती प्रमाणात धूळ जाऊ शकते याचा अंदाज केल्यास दुचाकीस्वारांबरोबर पादचाऱ्यांवरही ‘नको तो रस्ता’ अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.शहरातील अनेक रस्त्यांवर गेल्या वर्ष भरापासून डांबरीकरण न केल्याने अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य होते.त्यात शहरात ड्रेनेजची खुदाई करण्यात आली.ती पूर्णही झाली,पण खुदाईदरम्यान रस्ताभर पसरलेली माती तशीच होती.त्यामुळे रस्त्यावरून  मोठ्या गाड्या गेल्यानंतर जो धुळीचा लोट उठतो,तो तसाच रोडवरील दुकानात,घरात शिरत आहे.यामुळे केव्हा एकदा सगळ्या रस्त्यांचे पक्के डांबरीकरणासाठी होतंय असे नागरिकांना वाटत आहे.
शहरातील सगळ्याच रोडवरील खड्डे मुजवन्यात आले आहेत,त्यावर  क्रेटसारखी खडी पसरली आहे,त्याची धूळ प्रचंड उडत आहे.सुरुवातीला रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात मातियुक्त मुरूम टाकल्याने संपूर्ण रस्त्यावर मातीच माती झाली होती.आणि आता तें खड्डे डांबरीकरण करून त्यावर टाकलेल्या क्रश मुळे दुचाकी गेली तरी  मातीचा लोट उठत आहे.सध्या गावातल्या कुठल्याही रस्त्यावरून दुचाकीने अथवा चालतही जायचे असल्यास नाक बंद केल्याशिवाय पर्याय नाही.चारचाकी अथवा मोठे वाहन समोर असेल तर नाकातोंडात धूळ घेण्यापेक्षा थोडावेळ थांबलेले बरे असेच वाटते.या रस्त्यांवरील धूळ किती प्रमाणात उडत असते,हे तिथे लावलेल्या वाहनांवर साचलेल्या थरांवरून लक्षात येते.त्यामुळे हें तासगावच आहे का *धुळ* गाव असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.