प्रतिष्ठा न्यूज

“मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” ध्वजारोहण कार्यक्रम मंत्री महोदयांच्या उपस्थितीत साजरा होणार

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मुंबई यांच्या परिपत्रकानुसार मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 17 सप्टेंबर, 2023 रोज रविवारी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” साजरा करण्यात येणार आहे. यास्तव विभागीय मुख्यालय, औरंगाबाद येथे मा. मुख्यमंत्री- एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच मराठवाडा विभागातील नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांमध्ये खालील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहेत.
यात मा.मंत्री- श्री अब्दुल सत्तार (जालना) श्री गिरीष महाजन (नांदेड) श्री धनंजय मुंडे (बिड) श्री संजय बनसोडे (लातूर) श्री अतुल सावे (परभणी) श्री संदिपान भुमरे (हिंगोली) श्री तानाजी सावंत (उस्मानाबाद).

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.