प्रतिष्ठा न्यूज

शिवजन्मोत्सवा निमित्ताने सिडको येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : शिवजन्मोत्सवा निमित्ताने दि.25 फेब्रुवारी रोजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराच्या निर्भीड व रोखठोक वक्त्या तथा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान सायंकाळी 6 वाजता होणार आहे, असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने कळविन्यात आले आहे.
सिडको संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून जिजाऊ सृष्टी येथे शिवजन्मोत्सवानिमीत्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे याही वर्षी पुरोगामी विचाराच्या निर्भीड व रोखठोक वक्त्या तथा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान पर मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते- शिवानंद भानुसे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते- फारूख अहेमद यांचेही मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख- बबनराव थोरात उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष- कामाजीराव पवार हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख- भुजंगराव पाटील डक, सहसंपर्कप्रमुख- धोंडुदादा पाटील, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष- गोविंद दळवी, संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख- उमाकांत उफाडे, मराठा सेवा संघाचे प्रदेश सहसचिव- डॉ. पंजाबराव चव्हाण आदींची विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार- नागेश आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख- दत्ता पाटील कोकाटे, माधवराव पावडे, बबनराव बारसे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष- शिवाभाऊ नरंगले, राजेश्वर हात्तीअंबिरे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- भगवानराव कदम, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- परमेश्वर पाटील, शिवसेनेचे महानगराध्यक्ष- पप्पु जाधव, अर्जून ठाकूर, शिवसेना शहराध्यक्ष- गौरव कोडगीरे, वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष- विठ्ठल गायकवाड, आय्युब खान, शिवसेनेचे सिडको शहरप्रमुख- जितुसिंघ टाक आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व शिव प्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष- संकेत पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- सुभाष कोल्हे, प्रदीप गुबरे, दीपक भरकड आदींनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.