प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगात खरी लोकशाही निर्माण केली : सांळूके गुरूजी

प्रतिष्ठा न्युज
नांदेड/जिल्हा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून जगात खरी लोकशाही निर्माण केली. आपण त्यांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन उपक्रमशील शिक्षक श्री सांळूके गुरूजी यांनी केले. जि.प.प्रा.शाळा जाकापूर येथे मुख्याध्यापक श्री सी.आर.चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली छ.शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,छ.शिवाजी महाराज यांनी कृषी,पाणलोट,तलाव,याचा विकास केला.शत्रु पासून संरक्षण करण्यासाठी 350 भक्कम किल्ले उभारली. नाविक दल,सैन्य निर्माण केले.ते बहुजनांचे ,दूरदृष्टी असलेले राजे होते. त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर गंगाधर जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठा न्युज जिल्हा प्रतिनिधी राजू पवार हे उपस्थित होते.
यावेळी सहशिक्षक श्री सोळंके यांनी छ.शिवाजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच उपस्थित मान्यवरांनी छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी छ.शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी पत्रकार राजू पाटील पवार,ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी समयोचित भाषणे केली.
ग्रामपंचायत कार्यालयात छ.शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.सरपंच प्रतिनिधी गोपाळ पाटील जाधव,शिक्षण समिती उपाध्यक्ष हणमंत माधवराव पा.जाधव, शिवतेज मित्रमंडळ नवनाथ पा.शिरसे,श्री राजेश शिरसे,संभाजी ब्रिगेड तालूका उपाध्यक्ष श्री माधव पा.जाधव, श्री सिताराम पा.शिरसे,श्री पांडुरंग जाधव, श्री बालाजी कापसे,श्री धोंडीबा वाघमारे आदिजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार श्री साळूंके सर यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.