प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शहरातून दगड, खडी,मुरूमची क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक…प्रशासनाचे दुर्लक्ष..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : दगड,खडी,मुरूम,क्रशसँडची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची तासगाव शहरात सध्या जीवघेणी स्पर्धा वाढली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर महसूल,प्रादेशिक परिवहन, वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.शहरातून क्षमतेपेक्षा जास्त माल भरून जड वाहने बिनधास्त धावताना दिसून येत आहेत.परिवहन विभागासह वाहतूक व महसूल विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याने जडवाहनांची ही जीवघेणी स्पर्धा वाढली असल्याचे नागरिकांतून बोलले जात असून,वाहनचालक सर्रास नियमांची पायमल्ली करत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे,कर्कश हॉर्न वाजवणे,भरधाव व विरुद्ध दिशेने धोकादायकपणे वाहने चालवणे या जीवघेण्या स्पर्धेमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक,मालकांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे महसूल,परिवहन व पोलिस विभागाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुरूम,वाळू,खडी,क्रशसँड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आच्छादन बंधनकारक असताना नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. वाहतूक करताना हवेत उडणारे बारीक कण नागरिकांच्या विशेषतः दुचाकी वाहन धारकांच्या डोळ्यात जात असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.धुळीमुळे यापूर्वी सुद्धा अनेक अपघात झाले आहेत..
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.