प्रतिष्ठा न्यूज

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त : सांगलीत काँग्रेसची उस्फुर्त आझादी गौरव पदयात्रा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १२ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांगलीत काँग्रेस पक्षाच्यावतीने आझादी गौरव पदयात्रा मोठ्या उस्फूर्तपणे काढण्यात आली. या पदयात्रेचे नेतृत्व माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी केले. पदयात्रेच्या अग्रभागी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने, सीताबाई कुलकर्णी, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी रघुनाथ नार्वेकर, अशोक मालवणकर, अनिल माने अशोक वारे, जयसिंग सावंत, रामचंद्र पवार आदी सहभागी झाले होते.
पदयात्रेत सुसज्ज डिजिटल रथ सहभागी होता. देशातील थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा त्यावर झळकत होत्या. कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन सहभागी होते. एलईडी स्क्रीनवर स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला उजाळा देण्यात येत होता. क्रांती गीते आणि चित्रफितीही लावण्यात आल्या होत्या. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ‘जरा याद करो कुर्बानी…’ या गीताची धून वाजवण्यात येत होती. त्यामुळे वातावरण भारावून गेले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत केले, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांना अभिवादन केले.
वसंतदादा पाटील समाधीस्थळापासून सुरु झालेली ही पदयात्रा गवळी गल्ली – गणपती मंदिर – कापड पेठ – हरभट रोड – मारुती चौक – शिवाजी मंडई – रिसाला रोड – हिराबाग कॉर्नर – पंचमुखी मारुती मंदिर रोड – सिव्हील चौक – गारपीर चौक – गणेशनगर – झुलेलाल चौक मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आली. “वंदे मातरम”, “भारत माता की जय”, अमर रहे अमर रहे वसंतदादा अमर रहे” अशा घोषणाही यावेळी देण्यात येत होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा विजय असो, अशाही घोषणा होत्या.
यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्यावतीने आजादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे. देशाच्या विकासासाठी पक्षाने खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट् प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने ही पदयात्रा काढण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे.

यावेळी पदयात्रेत जितेश कदम, उपमहापौर उमेश पाटील, संजय मेंढे, डॉ. सिकंदर जमादार, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजीत भोसले, उत्तम साखळकर, संतोष पाटील, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, फिरोज पठाण, मदिना बारुदवाले, रवींद्र वळवडे, करीम मेस्त्री, दिलीप पाटील, अल्ताफ पेंढारी, कयुम पटवेगार, बिपिन कदम, आनंदा लेंगरे, सौरभ पाटील, आशा पाटील, सुवर्णा पाटील, क्रांती कदम, भारती भगत, रवींद्र खराडे, प्रमोद सूर्यवंशी, विजय आवळे, सनी धोत्रे, अयुब निशाणदार, प्रशांत देशमुख, संतोष भोसले, आशिष चौधरी, मौला वंटमोरे, अल्बर्ट सावर्डेकर, सुहेल बलबंड, रघुनाथ नार्वेकर, नामदेव चव्हाण, अजित ढोले, वसीम रोहिले, भाऊसाहेब पवार, अमित पारेकर, याकूब मनेर, महावीर पाटील, नाना घोरपडे, ताजुद्दीन शेख, श्रीनाथ देवकर, अमोल पाटील, राजेंद्र कांबळे, बाबगोंडा पाटील, अरुण पडसुळे, अमोल झांबरे, आबा जाधव, नितीन भगत, शेखर पाटील, मोईन जमादार, प्रशांत अहिवळे, नामदेव पठाडे आदींसह शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक, एन. एस. यू., सेवादल आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.