प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या जीवन विकास संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ थाटात…नामदेव महाराजांच्या पालखीला शिक्षणाधिकाऱ्यांचा खांदा..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भाड्याची एक खोली व 17 विद्यार्थ्यांना घेवुन सुरू झालेला संस्थेचा प्रवास शिक्षणाच्या विविध वाटा घेत आज 3000 वर विद्यार्थी व तीन मजली टोलेजंग इमारतीत येऊन पोहचला आहे.बालवाडी ते महाविद्यालयीन शिक्षण,कृषी, व्यवसाय व संगणक शिक्षण असा संख्येने विस्तार केला आहे,येथून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी नामवंत वकील,डॉकटर,इंजिनिअर,यशस्वी व्यावसायिक,शिक्षक शास्त्रज्ञ यासह ग्रामपंचायत ते सचिवालयापर्यंत विविध शासकीय पदांवर कार्यरत आहेत.येणाऱ्या वर्षात सन 2024 मध्ये जीवन विकास संस्था साठाव्या वर्षात पदार्पण करत   आहे.आजपर्यंतची संस्थेची वाटचाल, संस्थेची प्रगती म्हणजे एक ‘गरुडझेप’ आहे.समाजातील कित्येक पिढ्या, विद्यार्थी विद्यार्थीनी,संस्थेत काम करणारे सेवक या सर्वांचा ‘जीवन विकास’ या संस्थेने केलेला दिसून येतो.हिरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ करण्यात आला.उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी मा.मोहनराव गायकवाड तसेच प्रमुख वक्ते म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय वाळवा येथील प्राध्यापक डॉ.राजा माळगी यांची उपस्थिती लाभली.सदर कार्यक्रम हा विकास संस्थेचे अध्यक्ष मा.एल.डी.म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यानिकेतन विद्यासंकुल च्या प्रांगणात संपन्न झाला.प्रमुख उपस्थितीमध्ये संस्था सचिव मा. ऍड.सुनील महामुनी,संस्था कोषाध्यक्ष मा.अवधूत गडकर,संचालक मा. तुकाराम माळी,मा.गोपाळकृष्ण पागे हे संस्था पदाधिकारी व संस्था सदस्य, मुख्याध्यापक डी.एस.थोरवत , उपमुख्याध्यापक डी एम.कारंडे, पर्यवेक्षक एस.आर.सानप मुख्याध्यापिका डी एस.मुलाणी,प्राचार्य एच एल कांबळे, मुख्याध्यापिका आर पी.पाटील,व्ही.एन.सुर्यवंशी, सेवानिवत्ती मुख्याध्यापक एम.ए.गुरव सर,प्राध्यापक मनोहर डोईजड आदी मान्यवर,सेवानिवृत्त शिक्षक,प्राध्यापक उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी नीरा बाळकृष्ण सेवेकरी बालप्रबोधिनी,संत नामदेव नूतन मराठी ज्ञानप्रबोधिनी,जीवन ज्योती इंग्लिश मीडियम स्कूल,विद्यानिकेतन कृषी माध्यमिक विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज,महिला महाविद्यालय,बीसी ए विभाग,या सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक आजी- माजी विद्यार्थी – विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.दरम्यान शोभायात्रेचेही उद्घाटन करण्यात आले.संपूर्ण तासगाव शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये विविध शाखांच्या वतीने सक्रिय सहभाग घेण्यात आला. संस्थेसह विविध शाखांचे चित्ररथ,त्याचबरोबर टाळकरी,वारकरी नामदेव महाराज दिंडी,लेझीम पथक,झांज पथक,वेशभूषा परिधान केलेले सर्व विद्यार्थी,शिक्षक बंधू भगिनी सहभागी झालेले होते.जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.मोहनराव गायकवाड यांनी नामदेव महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन दर्शन घेतले.अतिशय नयनरम्य,विलोभनीय अशी शोभा यात्रा संपन्न झाली.हीरक महोत्सवाच्या निमित्ताने काढलेली शोभायात्रा तासगावकरांच्या व शिक्षकांसह सहभागी विद्यार्थ्यांच्या नेहमीच स्मरणात राहील अशीच होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.