प्रतिष्ठा न्यूज

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चा ओबीसी एल्गार महामेळाव्यास जाहीर पाठिंबा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीत 11 ऑगस्टला होणाऱ्या सकल ओबीसी यल्गार महामेळाव्यास आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबालभाई अन्सारी यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या संघटनेच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला .या पाठिंब्याचे पत्र ओबीसी एल्गार महामेळावा नियोजन समितीच्या समन्वयक संगीताताई खोत,व नियोजन समितीचे समन्वयक माजी नगरसेवक विष्णू माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या या लढ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय उपाध्यक्ष काशीम मुल्ला यांनी यावेळी बोलताना दिले आहे.
यावेळी राज्य समन्वयक नासिर शरिकमसलत,माजी नगरसेवक फिरोज पठाण, मैणुद्दीन मुजावर, जाकीर शरीकमसलत, मुन्ना शेख,आबिद खाटीक, फारुक मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.