प्रतिष्ठा न्यूज

पोलीस शिपाई चालक रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेतील कौशल्य चाचणी बुधवार दि.३ रोजी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई चालक रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेतील कौशल्य चाचणी (ड्रायव्हींग टेस्ट) दि. ०३/०७/२०२४ रोजी आयोजित केलेबाबत.

सांगली जिल्हा पोलीस दलात १३ रिक्त पोलीस शिपाई चालक पदांकरीता पात्र असलेल्या १:१५ प्रमाणे २०७ उमेदवारांची कौशल्य चाचणी (ड्रायव्हींग टेस्ट) ही विश्वेश्वरैया टेक्निकल कॅम्पस, पाटगांव, मिरज येथे घेण्यात येणार आहे. सदरची यादी सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम sp.sangli@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असुन उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कार्यालयाबाहेर व पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सांगली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे.

तरी यादीतील पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांचे मुळ कागदपत्रासह पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सांगली येथे दि. ०३/०७/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वाजता बिनचुक हजर रहावे. उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना कौशल्य चाचणी (ड्रायव्हींग टेस्ट) करीता पाटगांव येथे वाहनाने घेवून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगलीचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी माहिती पत्रकाद्वारे दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.