प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या आमदार खासदारांनी राजकारणातून सवड मिळाल्यास शेतकऱ्यांच्या व्यथांकडे बघावे : शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव कवठेमंकाळसह राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आलेला आहे,अशा परिस्थितीत तासगावचे लोकप्रतिनिधी असणारे खासदार व आमदार सेटलमेंटच्या  राजकारणात व्यस्त आहेत.त्यांनी थोडे दिवस राजकारण बाजूला ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी नेते संदिप गिड्डे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातील शेती अतिवृष्टीने अक्षरशः धुळीस मिळाली आहे.द्राक्ष बागांबरोबर खरीपाच क्षेत्र देखील या तालुक्यांमध्ये लक्षणीय आहे.खरिपाचा हंगाम काढणीला आला असताना मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे हातातला खरीप निघून गेला आहे. या परिस्थितीत द्राक्षे बागांच्या छाटण्या देखील अद्याप प्रलंबितच आहेत. शासनामार्फत तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर स्टेट बँकेच्या गलथान कारभारामुळे दिवाळीमध्ये जमा होऊ शकली नाही. तालुक्यातील कार्यकर्ते मंडळी केवळ भावी आमदार कोण यावर सुरसपणे चर्चा करताना दिसत आहेत.नेत्यांना देखील शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काही पडलेलं नाही असेच एकंदरीत चित्र आहे.मतदारसंघातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असताना राज्यकर्त्यांनी नुकतंच कवठेमंकाळ नगरपंचायतीमध्ये आपण घोडेबाजारात कसे सक्रिय आहोत हे दाखवून जनतेला एक प्रकारे ठेंगा दिला आहे.तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील राजकारण म्हणजे एक प्रकारचा सेटलमेंटचं धोरण असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालं आहे.त्यातच आगामी नगरपरिषद,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कवठेमंकाळ नगरपंचायत ही आमदार गटाने खासदार गटाला बहाल करून टाकली आहे.राज्यकर्त्यांची बनवाबनवी लपून राहिली नसून राज्यकर्त्यांनी आता जनतेला मूर्ख बनवण्यापेक्षा विकासाचे राजकारण करण्याची गरज आहे अशी अपेक्षा शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.