प्रतिष्ठा न्यूज

भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प : वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गुरुवारपासून तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीचा फटका करूळ प्रमाणे भुईबावडा घाटालाही बसला आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळून रस्ता तुटून गेल्यामुळे वाहातूक ठप्प झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १.३० वा. सुमारास घडली आहे. दरड कोसळल्यामुळे घाटात दोन्हीही बाजूला काही वाहाने अडकून पडली होती. जे.सी.बी.च्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
दरडीमुळे रस्ता तुटल्यामुळे घाटातील लवकर वाहातूक सुरु होण्याची शक्यता कमी आहे. या घाटातील वाहातूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.
तालुक्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. परिसरात पडणाऱ्या पावसाने करू ळ व भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याचे सञ सुरु आहे. गुरुवारीही दरड कोसळल्यामुळे वाहातूक विस्कळीत झाली होती. शुक्रवारी दुपारी पुन्हा गगनबावड्यापासून मागे ४ कि.मी.अंतरावर भुईबावडा घाटात डोंगरातून भूसख्खलन झाल्यासारखी भल्ली मोठी दरड रस्त्यावर कोसळली आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. ही दरड इतकी मोठी होती की या दरडीच्या दणक्याने घाटातील रस्ताच तुटून गेला आहे. दरड पडल्याची माहीती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.व्ही. जोशी व शाखा अभियंता कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने दरड हटविण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरु करण्यात आले आहे. दरड हटविली तरी रस्ता दरडीमुळे रस्ता खचल्यामुळे वाहातूक लवकर सुरु होणे अवघड बनले आहे.
वैभववाडी तालुक्यातील करुळ व भुईबावडा हे दोन महत्वाचे घाटमार्ग आहेत. रविवारी करुळ घाटात संरक्षक भिंत कोसळल्यामुळे घाटातील जड व अवजड वाहातूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. तर हलकी वाहातूक शनिवारपासून सुरु केली आहे. त्यामुळे सध्या भुईबावडा घाटातून जड वाहातूक सुरु होती. माञ भुईबावडा घाटातही दरड कोसळून रस्ता तुटल्यामुळे कोल्हापूरचा कोकणशी असलेला संपर्क तुटला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.