प्रतिष्ठा न्यूज

भाऊराव चव्हाण विद्यालयात स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केले अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : अर्धापुर तालुक्यातील येळेगाव-देगाव येथील भाऊराव चव्हाण विद्यालयात दि.20 जानेवारी 2023 रोज शुक्रवारी स्वयंशासन दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. एक दिवस संपूर्ण शाळा चालविण्याची जबाबदारी इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना सोपविण्यात आली या मागचा हेतू असा होता की विद्यार्थ्यांना अध्यापन करीत असताना शिक्षकांविषयी खूप आकर्षण असते व आदर असतो आपणही एक दिवस शिक्षक व्हावे अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते पण भविष्यामध्ये ही संधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही याची जाणीव ठेवून भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळा देगांव-येळेगांव येथे स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. घेण्यात आलेल्या तासिकमध्ये भाग घेतलेल्या विध्यार्थ्यांना अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले, त्यातच सर्वाधिक तासिका शारीरिक शिक्षणाच्या खूपच रंगल्या व विद्यार्थ्याने खेळामध्ये अतिशय उत्साहाने सहभाग होऊन खेळायचा आनंद लुटला. यात गायत्री जाधव, परमेश्वर तिडके, गायत्री जाधव, गायत्री गोंदगे या विद्यार्थी शिक्षक,शिक्षिका यांनी शारीरिक शिक्षणाच्या तासिका घेतल्या. या तासिका घेण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख जी.बी.मदने यांनी मार्गदर्शन केले.
    यावेळी शाळेतील गायत्री जाधव, शिवकन्या जाधव, श्रेया जाधव, परमेश्वर तिडके, गायत्री गोंदगे, दिशा मोरे,नेहा राऊत, ओमकार गोंदगे, शुभम अवतीरक, वैष्णवी तिडके, समीक्षा वाघमारे, श्रुती गोंदगे, स्वाती गोंदगे, सुप्रिया तिडके, राजश्री तिडके, सुरज तिडके, माधव तिडके, तिडके पल्लवी, श्रेया जाधव, गोंदगे आकाश, तिडके ऋतुजा ,अवातीरक अभिषेक, पांचाळ अश्विनी कंकाळ काजल बोचरे श्रुती लोकरे शुभम, लोकरे ओंकार, तुकाराम, स्वयंशासन दिनामध्ये सहभाग घेतला व अध्यापनाचे उकृष्ट काम केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बि.एस.शिंदे,जी.एम. भुस्से, स्वयंशासन दिन विभागप्रमुख एस.जी.मोरे,  जी.बी.मदने,एम.टी.भंडारकर, के.टी.जनकवाडे, अंजली राऊतवाड,अर्चना मुंगल, बाबाराव हंबर्डे, शिवाजी वाघमारे, प्रदीप भोसले, आदी उपस्थित राहून मोठे परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.