प्रतिष्ठा न्यूज

खाडे स्कूल मधील उन्हाळी शिबिराने शारीरिक विकासाबरोबर झाले मुलांचे मोबाईल वेड कमी….

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज येथे उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मुलांचा शारीरिक विकास व्हावा व मुलांचे मोबाईल वेड कमी व्हावे या दुहेरी हेतूने घेण्यात येत आहे. या शिबिरामध्ये मिरज व आजूबाजूच्या परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिरात मुलांना विविध खेळ प्रकारासोबत नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात आहे. मुले हसत खेळत अनेक नव्या गोष्टी शिकत आहेत. या शिबीरामुळे मुले तर आनंदी आहेतच पण पालकही समाधानी आहेत अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी दिली. तसेच पुढील काळात मुलांच्या भवितव्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील असेही सांगितले.
        मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी शिक्षकांच्या मदतीने उन्हाळी शिबिराचे नियोजन अत्यंत चोख केले आहे. या शिबिरामध्ये मुलांना घोडेस्वारी, नेमबाजी, कॉम्प्युटर डिझायनिंग व फन गेम, आर्ट अँड क्राफ्ट, ताईकांदो, डान्स, योगा इत्यादी खेळ व उपक्रम घेतले जात आहेत. हे उन्हाळी शिबीर पालकांच्या पसंतीला उतरले असून, संस्थेकडून पालकांच्या अपेक्षाही वाढल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.