प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समितीच्या सभापतींचा खोटारडेपना उघड… महादेव पाटलांचा घणाघात…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना पणन विभागाच्या परीपत्रकानुसार 8.33 % इतकाच बोनस देण्यात यावा त्याच्या वर देऊ नये अशी तक्रार आम्ही बाजार समितीकडे केली असताना, सभापती व सचिव यांनी नियम बाह्य 20% प्रमाणे बोनस काढून त्यातील 50 % रक्कम संचालकांनी वाटून घेतली असून शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे संचालका कडूनच वसुली लावणार असल्याचा इशारा संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.2020-21 च्या लेखापरीक्ष कांच्या अहवालात बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना 20% प्रमाणे 13लाख 20हजार 510 इतकी रक्कम देण्यात आली आहे.हे सर्व नियम बाह्य असून ऑडिट रिपोर्ट मध्ये ही बाब उगड झाली आहे.तसेच 2023 मध्ये सुमारे 17 लाख रुपये दिवाळी बोनस वाटप करण्यात आला व यातील 50% रक्कम तासगाव बाजार समितीच्या संचालकांनी वाटून घेतली असून, सभापतीनी मात्र असे काही झाले नसल्याचे सांगितले होते, मात्र या ऑडिट रिपोर्ट मुळे सभापती युवराज पाटील यांचा खोटारडे पना उगड झाला असून बोनसचा शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांकडून व संचालका कडून हे पैसे आम्ही वसुल करणार असल्याचा इशारा महादेव पाटील यांनी बोलताना दिला.तसेच बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचें नेते सहा महिन्यात नवीन बेदाणा मार्केट सुरु करणार असल्याचे सांगत होते, मात्र एक वर्ष उलटून गेले तरीही नवीन मार्केटचें कामं सुरु करण्यात आले नाही, तें कामं न करता बाजार समितीतील मिटिंग हॉल, सभापतीची केबिन,जुने मार्केट ऑफिस दुरुस्ती साठी तीस लाख रुपये रुपयांचा चुराडा करण्यात आला असून दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढण्याचा उद्योग सुरु असल्याचा आरोप महादेव पाटील यांनी यावेळी केला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.