प्रतिष्ठा न्यूज

श्री वाजेश्वर बाबा मंदिर यात्रा महोत्सवाला सुरुवात: विविध कार्यक्रमाची मेजवानी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :- लोहा तालुक्यातील वाका येथील 12 शतकातील श्री वाजेश्वर बाबा यांच्या यात्रा महोत्सव दि.2 डिसेंबर 2023 पासून प्रारंभ होत असल्याने मंदिर परिसराला सुंदर वैभव प्राप्त झाले आहे.
वाका येथे दरवर्षी श्री वाजेश्वर बाबा यात्रा महोत्सव साजरा केला जातो. यंदाही त्याचे नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास दि.2 डिसेंबर पासून प्रारंभ झाला आहे. बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाविशेषांची पालखीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघत असते. त्यानंतर दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. 3 दिवस चालणान्या या यात्रा महोत्सवामध्ये पारंपरिक दहीहंडी उत्सव, कुस्त्यांची दंगल, बहारदार लावण्यांचा कार्यक्रम आदी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.
दि.3 डिसेंबर रोज रविवारी सकाळी 9:00 वाजता पारंपरिक दहीहंडी उत्सव, दूपारी वाजता जंगी कुस्त्यांचा फड आणि रात्री श्री चक्रधर नाटयमंडळ निर्मित महाराष्ट्राची संस्कृती कला असलेल्या लावण्याचा कार्यक्रम होणार आहे.
तेंव्हा परिसरातील भाविकांनी या यात्रा महोत्सवात सहभागी व्हावे,असे आवाहन श्री वाजेश्वर बाबा मंदिर पुजारी व यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले
आहे.
400 वर्षांची परंपरा असलेल्या श्री वाजेश्वर बाबा मंदिर यात्रा महोत्सवाला मोठी परंपरा आहे. ती आजतागत कायम आहे. नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा व इतर राज्यातून भाविक मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.