प्रतिष्ठा न्यूज

सांगलीची अनुजा अजितकुमार कोळी राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेची विजेती

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
सांगली : महाराष्ट्र राज्य  ११-वर्षाखालील फिडे मानांकन निवड बुद्धिबळ स्पर्धा, २०२४, कोल्हापूर एकूण ८ फेऱ्यामध्ये झालेल्या या स्पर्धेत आंतरराष्टीय मानाकांन स्पर्धेचे निकष आणि पद्धत वापरली होती. आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विजेते खेळाडू सहभागी झाले होते.ज्यामध्ये उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेऊन आलेले तुल्यबळ खेळाडू, , अपार मेहनत आणि जिंकण्याची प्रखर इच्छा असलेले सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ११ वर्षाखालील चिमुकले सहभागी खेळाडू या स्पर्धेत तब्बल १० आंतरराष्ट्रीय प्राप्त खेळाडू आणि त्यामध्ये सांगलीची अनुजा अजितकुमार कोळी ज्या मुलीला आंतरराष्टीय मानांकन नाही अशी खेळाडू, आपल्या जबरदस्त खेळ कौशल्याचा वापर करून संपूर्ण स्पर्धेत ८ फेऱ्यामंध्ये अपराजित रहात ११ वर्षाखालील राज्य निवड स्पधेची विजेती ठरली.
        हैदराबाद इथे होणाऱ्या ११ वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करेल.
अनुजा कोळी ही केपीज चेस अकॅडमीची खेळाडू असून तिला पोर्णिमा उपळावीकर यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळत आहे.
       या यशामध्ये तिला पालक, तसेच कन्या पुरोहित शाळेचे सर्व शिक्षक, आणि सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष  गिरीशजी चितळे, सचिव चंद्रकांत वळवडे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.