प्रतिष्ठा न्यूज

राज्यभर स्वच्छतेचे अभियान राबविणाऱ्या आर आर आबांच्या तासगाव येथील पुतळ्याचीं दुरावस्था

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राजकारणातील स्वच्छ प्रतिमा असे व्यक्तीमत्त्व असणाऱ्या आर आर आबांनी मोठ्या कल्पकतेने सुरु केलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्य भरात राबवून स्वच्छतेचे महत्व राज्यातील जनतेला पटवून दिले होते.त्याची नोंद राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती.संत गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छतेचे अभियान सुरु करणाऱ्या या द्रष्ट्या नेत्याने राज्यातील गावागावांत स्वच्छतेसाठी निकोप स्पर्धा लावली होती.यातून महाराष्ट्रात खुपच मोठे क्रांतीकारी काम झाले.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात स्वच्छता नांदावी,स्वच्छतेमागून समृद्धी यावी असे स्पप्न संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आबांनी मांडले होते.त्याच आबांच्या तासगाव मार्केट यार्ड परिसरातील पुतळ्याची दुरावस्था झाली आहे.पुतळ्याच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले होते.हि माहिती मिळताच राष्ट्रवादीचें नगरसेवक बाळासाहेब सावंत, कार्यकर्ते अमित पवार, खंडू कदम, पवन जाधव यांनी पुतळ्याचीं आणि पुतळ्याच्या परिसराचीं स्वच्छता केली.यावेळी पुतळ्याची आणि आवाराची कायम स्वच्छता राखली जावी तसेच आबांच्या पुतळ्याचे कलर कामं लवकरात लवकर करावे अशी मागणी करण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.