प्रतिष्ठा न्यूज

बँक ऑफ महाराष्ट्र मांजर्डे शाखेच्या वतीने महिला बचत गटांसाठी कर्ज मेळावा संपन्न..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : बँक ऑफ महाराष्ट्र मांजर्डे शाखेच्या वतीने महिला बचत गटांसाठी कर्ज मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी २८ लाख रुपयांचे कर्ज वाटप विविध गटांना करण्यात आले.यावेळी बँकेकडून मांजर्डे,बलगवडे,डोर्ली,गौरगाव,आरवडे येथील विविध बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात आला.
बँकेकडून 2022-23 मध्ये 99 लाख 50 हजार तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत रु.52 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज बचत गटांना वाटप करण्यात आल्याची माहिती शाखा व्यवस्थापक स्वप्नील पाटील यांनी यावेळी दिली.या मेळाव्यावेळी शाखाधिकारी पाटील यांनी बचत गटांना मार्गदर्शन केले.तसेच विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली.यावेळी ऋषिकेश कंकाले, सुहास वायदंडे,बँकसखी मेघा थोरात, सीआरपी शैला पाटील,उज्वला मंडले, मुमताज अत्तार,मयुरी गुरव,अनुराधा कांबळे ग्रामस्य महिला उपस्थित होत्या.
 मांजर्डे (ता. तासगाव) बचत गट मेळाव्यात महिला महाराष्ट्र बँकेकडून कर्ज वाटप करण्यात आले यावेळी शाखाधिकारी स्वप्निल पाटील यांनी महिला बचत गटांना कर्ज मंजूर पत्र प्रदान केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.