प्रतिष्ठा न्यूज

गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याने सावळज पोलीस ठाण्याचा प्रस्ताव नामंजूर… माहिती अधिकारात बाब उघड..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव पोलिस ठाण्यावरील ताण कमी करणे व पूर्व भागातील जनतेच्या सोयीच्या दृष्टीने उभारण्यात येणारे सावळज पोलिस ठाणे प्रस्ताव गृहमंत्रालयाने 2019 मध्ये नामंजूर केल्याचे स्पस्ट झाले आहे.सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केदार यांनी माहिती अधिकारातून ही माहिती समोर आणल्याने सावळज पोलिस स्टेशन निर्मितीच्या नागरिकांच्या आशा मावळल्याचे समोर आले आहे.सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केदार यांनी ही माहिती उजेडात आणली आहे,सन 2015 मध्ये तत्कालीन डी.वाय.एस.पी.कृष्णात पिंगळे यांनी सावळज पोलिस दूर क्षेत्राचे पोलिस ठाण्यात रूपांतर करावे असा प्रस्ताव दिला होता.सदर प्रस्तावामध्ये सावळज गाव हे तासगाव पोलिस ठाणेपासून 21 कि.मी.अंतरावर आहे.येथे पूर्वीपासून पोलिस दूरक्षेत्र असून सावळजची लोकसंख्या 18 ते 20 हजार इतकी आहे.तसेच तेथे मोठी बाजारपेठ, ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिर आहे. मध्यवर्ती बँक,आय.सी.आय.सी.बँक,तासगाव अर्बन बँक व इतर पतसंस्था,ग्रामीण रुग्णालय,विद्युत वितरण कंपनीचे सब स्टेशन इतर कार्यालये आहेत.तसेच पोलिस दूरक्षेत्रात सावळज गावात पोलिस दूर क्षेत्रासाठी 10 गुंठे जमीन मंजूर असून त्याचा गट क्रमांक (1061) 559, अ 1/2 तसेच पोलिस लाईंनसाठी 10 गुंठे जमीन जमीन मंजूर असून त्याचा गट क्रमांक (1061) 560, ब.असा आहे.यामध्ये सावळज,डोंगरसोनी,अंजनी, वडगांव,लोकरेवाडी,गवळेवाडी, नागेवाडी,जरंडी,यमगरवाडी, वायफळे,बिरणवाडी,दहिवडी, सिद्धेवाडी,खुजगाव,वज्रचौंडे,गव्हाण, बस्तवडे,गौरगाव,वाघापूर,कौलगे अशी एकूण 20 गावे समाविष्ट आहेत.सदर
प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडून गृह विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी गेला होता.परंतु गृहमंत्रालयाने (गृहविभाग याचे क्रमांक पीओएस – 1019/ स.क्र.09/ पोल-3, दिनांक 02/01/ 2019) पत्रानुसार सावळज पोलिस दूरक्षेत्रात सरासरी *मागील तीन वर्षाची गुन्ह्यांची सरासरी 48 इतकी येत असल्याने सदर प्रस्ताव नामंजुर केला आहे* सदर प्रस्ताव नामंजूर झाल्याने तासगाव पोलिस स्टेशन असणारा कामाचां ताण अधिकच वाढून पूर्व भागातील जनतेची गैरसोय होणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.