प्रतिष्ठा न्यूज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाणी व रसनाचे वाटप

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवा निमीत्त दि.14 एप्रिल 2023 रोजी जयंती मिरवणुकीतील अनुयांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाणी व येथे थंड पेय रसनाचे वाटप करण्यात आले.
नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यालया समोर- संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांच्या हस्ते थंड पाणी बॉटलचे तर सिडको येथे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील यांच्या वतीने थंड रसनापेयाचे वाटप करण्यात येऊन मिरवणुकीतील सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
नांदेड येथील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्षाचे कार्यकर्ते नेहमीच सामाजिक कार्यात भाग घेतात.असेच आपले दायित्व पार पाडण्यासाठी त्यांनी आज दि.14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीतील अनुयायांना पाणी व रसना वाटप करत आपला सलोखा कायम ठेवला आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अँड. सतीशकुमार जाधव, प्रल्हाद दुरपुडे, बळीराम फाजगे, संभाजी ब्रिगेड उत्तर जिल्हाध्यक्ष- परमेश्वर पाटील, दक्षिण जिल्हाध्यक्ष- सुभाष पाटील कोल्हे, जिल्हा सचिव- कमलेश कदम, सुरज पाटील, महानगर अध्यक्ष- सतीश धुमाळ, शहर अध्यक्ष- मारोती मेडेवाड, अंकुश कोल्हे, बालाजी देशमुख, राहुल झडते, यांच्या सह अनेकांची मोठया प्रमाणावर उपस्थित होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.