प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्यस्तरीय “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” राज्य पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्यस्तरीय “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
    राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशी नुसार राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि 29 डिसेंबर 2022 रोजी राज्यातील 108 शिक्षकांची “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड जाहीर केली आहे.
   त्यात प्राथमिक विभाग -1) शिवाजी रामराव कराळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखेड, – माध्यमिक विभाग- 2) संजय दत्तराम शेळगे, जिल्हा परिषद हायस्कूल वाघी,ता.नांदेड,- आदिवासी क्षेत्र विभाग- 3) शिक्षक कैलास आनंदा नकुले, जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट, ता.किनवट, व स्काऊट विभाग- 4) प्रलोभ माधवराव कुलकर्णी, जिल्हा परिषद हायस्कूल वाघी, ता.नांदेड, 2021-2022 चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत.त्यातच संजय शेळगे यांनी यापुर्वी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले असल्यामुळे त्यांचे आंतर राष्ट्रीयस्तरावर लिखान झाले असुन आतापर्यंत एकूण 14 पुस्तकेही मोठया दिमाखात प्रकाशित आहेत.
    या सर्वांच्या निवडी बद्दल नांदेड शिक्षण विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी रत्नाकर पाटील मुंगल, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, अमरदीप अंजने पाटील, खाजगी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पवार, सुनील पाटील, गंगाधर कदम, वसंत सिरसाट, राजेश पवार पत्रकार, यांनीही अभिनंदन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.