प्रतिष्ठा न्यूज

दिव्यांग काजलला हवाच मदतीचा हात

वजीर सुळका, भैरवगड व हिरकणी कडा चढणारी पहिली दिव्यांग महिला : किलीमंजिरो ट्रेक करणारी राज्यातील पहिली दिव्यांग महिला ठरणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संजयनगर येथे राहणारी काजल दयानंद कांबळे. बारा वर्षांपूर्वी एसटी धडकल्याने अपघात होऊन तिला ४९ टक्के अपंगत्व आलेले आहे त्यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने सामान्य परिस्थिती असतानाही कुटुंबाने अंदाजे ४ ते ५ लाख रुपये खर्चून शस्त्रक्रिया केल्या. परंतु त्यात तिचा एक पाय (डावा) उंचीला कमी झाला व कायमचे अपंगत्व आहे. अशा ही परिस्थितीत तिने ट्रेकींग व गिर्यारोहणाची आवड जपत महाराष्ट्रातील सर्वोच कळसूबाई शिखर सर केले आहे. तसेच वजीर सुळका, भैरवगड व हिरकणी कडा चढणारी पहिली दिव्यांग महिला असून, सध्या किलीमंजिरो ट्रेकींगला जाणारी राज्यातील पहिली दिव्यांग महिला ठरणार आहे. पण त्याचा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त असून, तिला आता शहरातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे. त्यांच्या सहाय्यानेच तिचे हे स्वप्न साकार होवू शकते.

कु. काजलने शिवुर्जा प्रतिष्ठानचे शिवाजी गडे यांच्यासोबत दोन वेळेस (१ जानेवारी २०२१ व १ जानेवारी २०२२) या दिवशी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केले आहे. त्याचसोबत पॉईंट ब्रेक अडव्हेंचर सोबत ८ मार्च २०२१ रोजी महिलादिनी २५० फुट उंच व ९० अंश सरळसोट असणारा अत्यंत कठीण अवघड असा वजीर सुळका सर केला आहे. तर ८ मार्च २०२२ रोजी महिला दिनी २७०० फुट उंच असलेला हिरकणी कडा सर केला आहे. तसेच आतापर्यंत अंकाई-टंकाई, खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग, रेवदंडा, बिरवडी किल्ला, कोरलाई किल्ला, मुरुड जंजिरा, कुलाबा, बोरीगड, पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती आणि ४०० फुट उंच मोरोशीचा भैरवगड सुद्धा सर केला आहे. बजीर सुळका, हिरकणीकडा, भैरवगड हे अत्यंत कठीण सुळके सर करणारी ती महाराष्ट्रातील पहिली दिव्यांग महिला ठरली आहे.

यापुढे ही काजलला महाराष्ट्रातील आणि हिमालयातील अनेक शिखरे सर करण्याची इच्छा असून, तिला जगातील सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करण्याची मनिषा आहे. त्यातीलच एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे सर्वोच्च शिखर किलीमंजिरो, दक्षिण आफ्रिका येथील हे सर्वोच्च व अवघड शिखर माऊंट किलीमंजारो (शिखर ऊंची १९३४१ फुट उंच असून ५९५१ मीटर आहे). २६ जानेवारी २०२३ रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी हे शिखर तिला भारताचा तिरंगा फडकवून सर करायचा आहे. ही मोहीम एकूण दहा दिवसाची असून हे शिखर ती सोलापूरचे माऊंट एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्सप्लोर सोबत सर करणार आहे. हे शिखर सर करणारी ती महाराष्ट्रातील पहिलीच दिव्यांग महिला असेल. परंतु त्यासाठी ६,७४,००० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तिला घरच्या परिस्थितीमुळे हा खर्च करणे अशक्य असून परवडणारा नाही. परंतू तिची ही दुर्दम्य इच्छा असल्याने शहरातील दानशूर व्यक्तिंनी आर्थिक मदतीचा हात पुढे केल्यास हे शक्य होणार आहे. यासाठी तिला जास्तीत जास्त आर्थिक मदत देऊन सहकार्य व उपकृत करावे, असे तिने आवाहन केले आहे. सर्व आर्थिक मदत तिच्या बँक ऑफ इंडिया, शाखा विश्रामबाग खाते नं. १५०७१०११००२३८०८ (आयएफएससी कोड BKID०००१५०७) यावर पाठवावी, अशीही तिने विनंती केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.