प्रतिष्ठा न्यूज

स्वच्छतेसाठी धावणे जनजागृती मोहिमेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: सीईओ मीनल करनवाल यांनी साधला संवाद

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : संपूर्ण देशात दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये “स्वच्छता ही सेवा ” हा पंधरवाडा राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छतेसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. कचरा मुक्त भारतः हे ब्रिद घेऊन हा पंधरवडा सुरू आहे. त्याचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जिल्हा परिषद कर्मचारी गणेश मंडळ व पंचायत समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी नांदेड शहरात स्वच्छता रनचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता जागृती धावणे रॅलीस विद्यार्थी, शिक्षक,पालक यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास पणे संवाद साधला. स्वच्छतेचा मंत्र दिला.

सकाळी साडेसात वाजता

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या स्वच्छता रनला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मायेदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, कार्यकारी अभियंता ए. आर. चितळे, कार्यकारी अभियंता रायभोगे, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, शुभम तेलेवार डॉक्टर नंदलाल लोकडे महेंद्र वाठोरे विठ्ठल चिगळे , भारत स्काऊट संघटन आयुक्त जनार्दन ईरले, एन.सी.सी.प्रमुख डॉ.माणिक गाडेकर , श्री केंद्रे, ,श्री फुलारी, श्री सोनटक्के,श्री पवार,श्री माळेगावे सर, जिल्हा गाईड आयुक्त श्रीमती शिवकाशी तांडे, तसेच गुजराती हायस्कूल ,राजश्री शाहू विद्यालय वसंत नगर, महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर ,श्री निकेतन हायस्कूल,आंध्र समिती हायस्कूलचे विद्यार्थी पालक शिक्षक जिल्हा परिषदचे खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी गणेश मंडळाच्या पदाधिकारी आदी सर्वजण सहभागी झाले होते. स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास उपक्रम स्वच्छता पंधरवाडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत एक आक्टोबर रोजी जिल्ह्यात स्वच्छतेसाठी एक तारीख एक उपक्रम राबविण्यात येणार आहे .या अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.
आपण राहत असलेल्या परिसराची, आपल्या गावाची, शहराची, परिसराची, स्वच्छता ठेवण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सक्रिय उत्स्फूर्त पणे सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.
स्वच्छता रन,धावणे रॅली
महात्मा गांधी यांच्या स्मारकापासून सुरूवात होऊन , महावीर चौक, वजीराबाद, एस.पी. ऑफिस कॉर्नर मार्गे जिल्हा परिषद पर्यंत काढण्यात आली. जि.प. प्रांगणात या स्वच्छता धावचा स्वच्छतेची शपथ घेवून समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी गणेश मंडळाचे अध्यक्ष धनंजय घुमलवार, राघवेंद्र मदनकर, पवन तलवारें, मिलिंद व्यवहारे, शुभम तेलेवार, डॉक्टर नंदलाल रोकडे ,महेंद्र वाटोळे ,विठ्ठल चिगळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्वांना स्वच्छतेसाठी शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार श्री प्रलोभ कुलकर्णी यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.