खाडे इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मिरज फुटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड
प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज: जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे घेण्यात आलेल्या शाळा क्रीडा स्पर्धेमध्ये मातोश्री तानुबाई दगडू खाडे आणि ज्युनिअर कॉलेज मिरज च्या १४ वर्षीय गटामध्ये खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत विभागासाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे पालक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे . या स्पर्धेसाठी एकूण १८ संघ सहभागी झाले होते. या अटीतटीच्या सामन्यांमध्ये खाडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना फुटबॉलचे मार्गदर्शक आकाश पांढरे व क्रीडा शिक्षक स्टीफन काकी यांचे मार्गदर्शन लाभले.
यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे, संस्थेच्या खजिनदार सुमनताई खाडे, संचालक सुशांत दादा खाडे व शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांचे मार्गदर्शन लाभले.