प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय, ज्युनियर कॉलेज नांदेड येथे कामगार दिन महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.2 : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय व जुनिअर कॉलेज, कस्तुरबा गांधी विद्यालय तसेच राजर्षी शाहू बालक मंदिर येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी “गर्जा महाराष्ट्र माझा ” हे राज्य गीत सामुहिक रित्या गायण्यात येऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री बी. एम. हंगरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा शिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रथम,द्वितीय,तृतीय जाहीर करता येत नाही. मात्र इयत्ता नववीतील पाचही तुकडीतील नववीच्या प्रथम, द्वितीय ,तृतीय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यावेळी गुणपत्रक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच एन एम .एम .एस परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय विशेष प्राविण्यासह यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उप मुख्याध्यापक डॉ पांडुरंग यमलवाड, पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत प्रा. आर.डी. देशमुख प्रा. डॉ. तुकाराम जाधव ,श्री बालाजी कदम , श्री आनंद मोरे, वसंत भोसले, श्री एन.
पी.केंद्रे,श्री सोनाजी वाडेकर, अमोल भंगाळे,श्री टी.एन.रामनबैनवाड,डाॅ. माणिक गाडेकर, श्री विठ्ठल पोकलेवाड,तसेच श्रीमती खुळे मॅडम, श्रीमती जायेभाये, श्रीमती गीरी, श्रीमती देगलूरकर,श्रीमती बायस,श्रीमती रामोड,श्रीमती पोहरे,श्रीमती लोलम,श्रीमती घोडेकर,श्रीमती जाधव,श्रीमती लक्ष्मीबाई वानोळे,तसेच कस्तुरबा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बि.डी. देशमुख ,श्री सूर्यकांत टापरे अशोक गळेगावे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.